Tech : ​अशी मिळवा कोणत्याही नंबरची ‘कॉल डिटेल’, सोपी आहे प्रोसेस !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2017 12:38 PM2017-06-07T12:38:23+5:302017-06-07T18:08:23+5:30

गूगल प्ले स्टोरवर एक असे अ‍ॅप आहे, ज्याद्वारे आपण कोणत्याही मोबाइल नंबरची कॉल डिटेल सहज मिळवू शकता.

Tech: Get the 'Call Detail' of any number, it's a simple process! | Tech : ​अशी मिळवा कोणत्याही नंबरची ‘कॉल डिटेल’, सोपी आहे प्रोसेस !

Tech : ​अशी मिळवा कोणत्याही नंबरची ‘कॉल डिटेल’, सोपी आहे प्रोसेस !

googlenewsNext
गल प्ले स्टोरवर एक असे अ‍ॅप आहे, ज्याद्वारे आपण कोणत्याही मोबाइल नंबरची कॉल डिटेल सहज मिळवू शकता. यासाठी आपल्याला ज्या नंबरची कॉल डिटेल काढायची आहे त्या फोनमध्ये 'mubble app' इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर या अ‍ॅपद्वारा आपल्याकडून करण्यात आलेले सर्व आउटगोइंग कॉलची डिटेल मेल आयडीवर सेंड करण्यात येईल. विशेष म्हणजे याने प्रीपेड आणि पोस्टपेड दोघांची कॉल डिटेल काढू शकता. मात्र या प्रक्रियेत आपण इनकमिंग कॉल्सची डिटेल काढू शकत नाही. 

- काय आहे प्रक्रिया 
* फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर ज्या नंबरची कॉल डिटेल आपणास काढायची आहे, तो नंबर टाकावा लागतो. 
* प्रायव्हसीवरु न यूजर काही परमिशन घेऊन हे अ‍ॅप सुरु करु शकतो. 
* डिटेलचा मेल त्याच आयडीवर येतो जो मेल आयडी लॉगिन दरम्यान दिला असेल. यात तारीख, वेळ, नंबर आणि कॉल कालावधी अशी संपूर्ण डिटेल असते. 
* याद्वारे आपण ७ दिवसापासून ते ३० दिवसापर्यंतची कॉल डिटेल काढू शकतो. 
* विशेष म्हणजे या अ‍ॅपद्वारे बॅलेन्स आणि डाटादेखील चेक करता येते. लो डाटा असेल तर रिमांडरदेखील करतो. शिवाय याद्वारे आपण कोणत्याही मोबाइल नंबरवर रिचार्ज करु शकतो. 

Web Title: Tech: Get the 'Call Detail' of any number, it's a simple process!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.