TECH : फेसबुक मॅसेंजरवर ग्रुप पेमेंटची सुविधा येणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 12:13 PM2017-04-14T12:13:16+5:302017-04-14T17:43:16+5:30

एकाच वेळी अनेकांना पैसे पाठविण्याची सुविधा म्हणजेच ग्रुप पेमेंट सर्व्हिस लवकरच फेसबुक मॅसेंजरवर सुरु होणार असल्याचे संकेत आहेत

TECH: Group payment facility will be available on Facebook Messenger! | TECH : फेसबुक मॅसेंजरवर ग्रुप पेमेंटची सुविधा येणार !

TECH : फेसबुक मॅसेंजरवर ग्रुप पेमेंटची सुविधा येणार !

Next
ong>-Ravindra More
एकाच वेळी अनेकांना पैसे पाठविण्याची सुविधा म्हणजेच ग्रुप पेमेंट सर्व्हिस लवकरच फेसबुक मॅसेंजरवर सुरु होणार असल्याचे संकेत आहेत. ही बातमी फेसबुक यूजर्ससाठी असून या अंतर्गत एका वेळी अनेकांना पैसे पाठवता येणार आहेत.
फेसबुकने आपल्या आॅफिशिअल ब्लॉगपोस्टवर म्हटले आहे, 'आजपासून अ‍ॅन्ड्रॉईड व डेस्कटॉपवरून फेसबुक मॅसेंजरवर ग्रुपला पैसे पाठवता येतील. ही पद्धत अत्यंत सोपी व सुरक्षित आहे. तुम्ही यामार्फत हॉटेलचे बिलही भरू शकता. किंवा पार्टीसाठी पैसे गोळा करू शकता.' 
फेसबुकने मॅसेंजर पेमेंट सर्व्हिसची सुरूवात २०१५ मध्ये केली होती. आतापर्यंत यामार्फत एका वेळी एकाच व्यक्तीला पैसे पाठवता येत होते. नवीन सुविधेमुळे आता ग्रुपमध्येही पैसे पाठवता येणार आहेत. 
ही सुविधा सध्या भारतात सुरू झाली नसली, तरी येणाºया काळात भारतातही या सुविधेचा शुभारंभ झाल्यानंतर मॅसेंजर वापरकर्त्यांना याचा लाभ घेता येईल. 

Web Title: TECH: Group payment facility will be available on Facebook Messenger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.