TECH : स्मार्टफोनच्या कॅल्क्युलेटरमध्ये लपवा सिक्रेट माहिती !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2017 12:27 PM2017-02-19T12:27:57+5:302017-02-19T17:57:57+5:30

महत्त्वाच्या फाईल्स किंवा वैयक्तिक डाटा सुरक्षित राहिल याची शाश्वती नसते. मात्र आता आपण स्मार्टफोनमधीलच कॅल्क्युलेटरच्या साह्याने आपली सिक्रेट माहिती लपवू शकता.

TECH: Hide information in a smartphone's calculator! | TECH : स्मार्टफोनच्या कॅल्क्युलेटरमध्ये लपवा सिक्रेट माहिती !

TECH : स्मार्टफोनच्या कॅल्क्युलेटरमध्ये लपवा सिक्रेट माहिती !

Next
प्रत्येकाची गरज स्मार्टफोन झाला आहे. त्यात आपली सर्व माहितीही स्टोर केली जाऊ शकते. मात्र अ‍ॅँड्रॉईड फोन हॅक होत असल्याने आपली वैयक्तिक माहिती चोरली जाण्याची भीती असते. अशावेळी बहुतेकजण पासवर्डचाही वापर करतात, मात्र तरीही आपल्या महत्त्वाच्या फाईल्स किंवा वैयक्तिक डाटा सुरक्षित राहिल याची शाश्वती नसते. मात्र आता आपण स्मार्टफोनमधीलच कॅल्क्युलेटरच्या साह्याने आपली सिक्रेट माहिती लपवू शकता. 

काय उपाय कराल? 

* गुगल प्ले स्टोअरवरुन ‘स्मार्ट हाईड कॅल्क्युलेटर’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. 

* हे अ‍ॅप ओपन केल्यावर पासवर्ड सेट करावा लागेल. पासवर्ड सेट केल्यावर त्याला कन्फर्म करा. 

* यानंतर तुम्हाला एक अ‍ॅडिशनल पासवर्ड मागितला जाईल. ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. 

* तुम्हाला ओके साठी (=) या चिन्हाचा वापर करावा लागेल. 

* पासवर्ड सेट केल्यानंतर तुमच्यासमोर हाईड फाईल्स आणि अनहाईड फाईल्स असा पर्याय येईल. 

* यानंतर हाईड फाईल्सवर क्लिक करून ज्या फाईल्स हाईड करायच्या आहेत त्यांना सिलेक्ट करून हाईड करा. तुमची फाईल हाईड होईल.

Web Title: TECH: Hide information in a smartphone's calculator!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.