TECH : 'स्क्रिनशॉट' कसा घ्याल !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2017 07:30 AM2017-02-24T07:30:36+5:302017-02-24T13:03:58+5:30
आपण फक्त ‘स्क्रिनशॉट’ हे नाव ऐकतो, मात्र तो कसा घ्यायचा हे आपणास माहित नसते. आपल्या जवळ स्मार्टफोन अथवा संगणक असते मात्र स्क्रिनशॉट घेता येत नसल्याने आवश्यक माहिती किंवा चित्र गरजेचे असूनही ते साठवून ठेवू शकत नाही.
Next
आपल्या संगणकाच्या किंवा स्मार्टफोनच्या स्क्रिनचे छायाचित्र काढणे यास ‘स्क्रिनशॉट’ घेणे असे म्हणतात. बहुतांश स्क्रिनशॉटचा वापर आपल्या अडचणी सोडविण्यासाठी, स्क्रिनवरील मजकूर किंवा चित्र साठवून ठेवण्यासाठी केला जातो. बऱ्याचदा आपण फक्त ‘स्क्रिनशॉट’ हे नाव ऐकतो, मात्र तो कसा घ्यायचा हे आपणास माहित नसते. आपल्या जवळ स्मार्टफोन अथवा संगणक असते मात्र स्क्रिनशॉट घेता येत नसल्याने आवश्यक माहिती किंवा चित्र गरजेचे असूनही ते साठवून ठेवू शकत नाही.
* संगणकावर स्क्रिनशॉट कसा घ्याल?
सर्वसाधारणपणे आपण सगळेच आपल्या संगणकावर विंडोज ही आॅपरेटींग सिस्टीम वापरतो. तेंव्हा मी त्या अनुशंगाने ही माहिती सांगत आहे. आपल्या संगणकाच्या स्क्रिनचे छायाचित्र काढणे, स्क्रिनशॉट घेणे हे अत्यंत सोपे आहे. आपल्याला केवळ आपल्या कीबोर्डवरील prt sc (पीआरटी एससी) बटण दाबायचे. असे केल्याने सहज स्क्रिनशॉट निघतो.
*आता हा स्क्रिनशॉट साठवायचा कसा?
Windows च्या प्रत्येक संगणकात पूवीर्पासूनच Paint (पेंट) नावाचे एक सॉफ्टवेअर असते. ते सॉफ्टवेअर उघडा. Paint सापडत नसल्यास विंडोजच्या सर्चमधून त्याचा शोध घ्या. हे सॉफ्टवेअर उघडल्यानंतर आपल्याला केवळ आपल्या कीबोर्डवरील ctrl हे बटण दाबून ठेवत v हे बटण दाबायचे आहे किंवा सरळ राईट क्लिक करुन Paste या पयार्याची निवड करा. आपला स्क्रिनशॉट आपल्याला Paint मध्ये दिसू लागेल. आता हा स्क्रिनशॉट Save करा. अशाप्रकारे आपण अगदी सहजतेने आपल्या संगणकाच्या स्क्रिनचा स्क्रिनशॉट घेतलेला आहे.
* स्मार्टफोनवर स्क्रिनशॉट कसा घ्याल?
स्मार्टफोनवरुन स्क्रिनशॉट घेणे तर प्रचंड सोपे आहे. आपल्या स्मार्टफोनवर Volume (व्हॉल्यूम) आणि Power (पॉवर) असे दोन स्वतंत्र बटण असतील. आपल्याला केवळ एव्हढेच करायचे आहे की, व्हॉल्यूम बटणावरील गाण्याचा आवाज कमी करण्याकरीता वापरली जाणारी बाजू आणि पॉवरचे बटण हे एकाचवेळी एकत्रितपणे दाबायचे आहेत. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रिनचा स्क्रिनशॉट निघेल. हा स्क्रिनशॉट आपल्या फोनवरील फोटो गॅलरीत आपोआप साठवला जाईल, तेंव्हा आपणास स्वतंत्रपणे काही करण्याची आवश्यकता नाही.आपल्या फोनच्या फोटो गॅलरीत जाऊन आपण तो स्क्रिनशॉट पाहू शकाल.