TECH : ​आपल्या स्मार्टफोनमध्ये ‘व्हायरस’ आहे हे कसे ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 10:02 AM2017-05-18T10:02:08+5:302017-05-18T15:32:08+5:30

अ‍ॅपलच्या तुलनेने अ‍ँड्रॉइडमध्ये व्हायरस लवकर येतात. काही अशा टिक्स आहेत, ज्याद्वारे आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस आहेत की नाही हे ओळखले जाऊ शकते.

TECH: How will you know that your smartphone has a 'virus'? | TECH : ​आपल्या स्मार्टफोनमध्ये ‘व्हायरस’ आहे हे कसे ओळखाल?

TECH : ​आपल्या स्मार्टफोनमध्ये ‘व्हायरस’ आहे हे कसे ओळखाल?

Next
‍ँड्रॉइड’ ही जगभरात सर्वात जास्त वापरण्यात येणारी आॅपरेटिंग सिस्टम आहे. संपूर्ण जगात सुमारे १ अरबपेक्षाही जास्त अ‍ँड्रॉइड वापरकर्ते आहेत. या वापरकर्त्यांना आपल्या जाळ्यात फसविण्यासाठी हॅकर्स नवनवीन ट्रिक्सचा वापर करीत आहेत. हॅकर्स स्मार्टफोनधारकांना विशिष्ट अ‍ॅप डाउनलोड करण्यास प्रवृत्त करतात आणि त्याद्वारे संपूर्ण माहिती चोरुन घेतात. विशेष म्हणजे अ‍ॅपलच्या तुलनेने अ‍ँड्रॉइडमध्ये व्हायरस लवकर येतात. काही अशा टिक्स आहेत, ज्याद्वारे आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस आहेत की नाही हे ओळखले जाऊ शकते. 

* जास्त बॅटरी खर्च होणे
व्हायरसने फक्त आपल्या मोबाइलचा डाटाच खर्च होत नाही तर मोबाइलच्या बॅटरीवरदेखील याचा परिणाम होतो. जर आपण व्हायरसयुक्त अ‍ॅप डाउनलोड केले तर आपल्या मोबाइलची बॅटरी वेगाने खर्च होते. 

* अनावश्यक अ‍ॅप
काही असे अ‍ॅप असतात जे नकळत आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल होतात. ट्रोजन मॅलवेयरद्वारा मोबाइलसाठी हे अ‍ॅप्स आपल्या मोबाइलमध्ये आॅटोमेटिक डाउनलोड होतात.   

* डाटा जास्त खर्च होणे 
जर अचानक आपल्या मोबाइलचा डाटा जास्त खर्च होऊ लागला असेल तर आपल्या मोबाइलमध्ये व्हायरस आहेत असे समजावे. जर गेल्या महिन्याच्या तुलनेने आपला डाटा अचानक विना वापर करता जास्त खर्च झाला तर आपल्या मोबाइल किंवा टॅबमध्ये व्हायरस शिरल्याचा संकेत आहे. 

* एक्स्ट्रा चार्ज
जर आपल्या मोबाइल बिलामध्ये अनावश्यक एक्स्ट्रा चार्ज आकारण्यात येत असेल तर हे देखील व्हायरस असल्याचे कारण आहे. अशावेळी आपल्या मोबाइलमध्ये प्रीमियम रेट नंबर्सवर टेक्स्ट मॅसेज पाठविले जातात आणि आपणाकडून याचे पैसे आकारले जातात. प्रीमियम रेट नंबर एक विशिष्ट प्रकारचा नंबर असतो ज्यावर मॅसेज पाठविण्याचे चार्जेस सामान्य मॅसेजच्या तुलनेने जास्त असतात. 

* अचानक येणारे पॉप-अ‍ॅप्स
जर आपण पॉप-अ‍ॅप्स, नोटिफिकेशन्स, अनावश्यक रिमायंडर आणि सिस्टम वॉर्निंग सारखे नोटिफिकेशन्सवर क्लिक करीत असाल तर याद्वारेदेखील डिव्हाइसमध्ये व्हायरस वाढू शकतात. 

* व्हायरसपासून कशी मिळवाल सुटका
जर आपला मोबाइल व्हायरसच्या कारणाने स्लो काम करत असेल तर डिवाइसला क्लिन करण्यासाठी काही टिप्स फॉलो करु शकतात. 

* संदिग्ध अ‍ॅप डिलीट करा
याप्रकारचे अ‍ॅप डिलीट करण्यासाठी सेटिंग्समध्ये जावे. त्यानंतर अ‍ॅप्लिकेशन मॅनेजरवर जाऊन क्लिक करावे. ज्या अ‍ॅपला डिलीट करायचे आहे, त्यावर टॅप करावे. असे केल्याने त्या अ‍ॅपची माहिती खुलेल. सर्वात अगोदर त्या अ‍ॅपचे कॅश क्लियर करावे आणि त्यानंतर अ‍ॅपचा डाटा क्लियर करण्यासाठी क्लियर डाटावर टॅप करावे. हे सर्व केल्यानंतर अनइन्स्टॉल बटनवर क्लिक करुन अ‍ॅप रिमूव्ह करावे.  

Also Read : ​ फॉर्मेट न करता फोनमधून काढा व्हायरस!

Web Title: TECH: How will you know that your smartphone has a 'virus'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.