TECH : ​मोबाइल नंबर न सांगताही करा रिचार्ज !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 12:45 PM2017-03-24T12:45:26+5:302017-03-24T18:15:26+5:30

सुंदर तरुणींच्या मोबाइल क्रमाकांना वाढीव पैसे आकारत काही रिचार्ज करणारे विक्रेते इतरांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार अलीकडेच उघडकीस आला. या पार्श्वभूमिवर व्होडाफोनने मोबाइल क्रमांक न सांगतांनाही रिचार्ज करण्याची सुविधा प्रदान केली आहे.

TECH: Make the mobile number even without recharging! | TECH : ​मोबाइल नंबर न सांगताही करा रिचार्ज !

TECH : ​मोबाइल नंबर न सांगताही करा रिचार्ज !

Next
ंदर तरुणींच्या मोबाइल क्रमाकांना वाढीव पैसे आकारत काही रिचार्ज करणारे विक्रेते इतरांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार अलीकडेच उघडकीस आला. या पार्श्वभूमिवर व्होडाफोनने मोबाइल क्रमांक न सांगतांनाही रिचार्ज करण्याची सुविधा प्रदान केली आहे.
या कंपनीने ‘प्रायव्हेट रिचार्ज मोड’ म्हणजेच ‘पीआरएम’ सेवा सुरू केली असून या सुविधेसाठी ‘१२६०४’ या क्रमांकावर 'private' असे टाईप करून एसएमएस पाठवायचा आहे. विशेष म्हणजे हा क्रमांक ‘टोल फ्री’असल्यामुळे या एसएमएससाठी कोणतीही आकारणी करण्यात येणार नाही. तसेच मोबाइलमध्ये बॅलन्स नसला तरी एमएमएस पाठविता येईल. यानंतर त्या मोबाईल क्रमांकावर एक ‘वन टाईम पासवर्ड’ म्हणजेच ‘ओटीपी’ पाठविण्यात येईल. हा ओटीपी क्रमांक मोबाइल रिचार्ज करणाऱ्या विक्रेत्याला दिल्यानंतर तो हव्या त्या रकमेचे रिचार्ज करेल. यासाठी त्या विक्रेत्याला मोबाईल क्रमांक सांगण्याची गरजदेखील उरणार नाही. व्होडाफोनने प्रारंभी पश्चिम बंगालमध्ये ‘प्रायव्हेट रिचार्ज मोड’ही सेवा लॉंच केली असून येत्या काही दिवसांमध्ये भारतातील अन्य सर्कल्समध्येही ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: TECH: Make the mobile number even without recharging!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.