TECH : आता व्हॉट्स अ‍ॅपद्वारे मित्रांवर ठेवा नजर !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 12:34 PM2017-02-02T12:34:49+5:302017-02-02T18:05:22+5:30

एका अशा फिचरवर काम सुरू आहे ज्यामुळे तुमच्या मित्रांचे लोकेशन कळून तुम्ही त्यांच्यावर नजरही ठेवू शकाल. विशेष म्हणजे ही रियल टाईम सुविधा असेल.

TECH: Now keep an eye on friends through the What's App! | TECH : आता व्हॉट्स अ‍ॅपद्वारे मित्रांवर ठेवा नजर !

TECH : आता व्हॉट्स अ‍ॅपद्वारे मित्रांवर ठेवा नजर !

Next
हॉट्स अ‍ॅप  आपल्या यूजर्सना नेहमी अपडेट ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून आता एका अशा फिचरवर काम सुरू आहे ज्यामुळे तुमच्या मित्रांचे लोकेशन कळून तुम्ही त्यांच्यावर नजरही ठेवू शकाल. विशेष म्हणजे ही रियल टाईम सुविधा असेल. एका वेबसाइटवरील  माहितीनुसार, हे फिचर अँड्रॉईडच्या वीटा व्हर्जन २.१७.३.२८ वर व आयओएसच्या २.१६.३९९ प्लस वर उपलब्ध आहे. परंतु हे डिफॉल्ट स्वरूपात सक्रीय नाही.

फोनएरेना डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, लोकेशनची माहिती एक मिनिट, दोन मिनिट किंवा पाच मिनिटांच्या अनिश्चित काळासाठी मिळवता येईल. सर्व ग्रुप मिळून एखाद्या ठिकाणी भेटायचे असल्यास कोण कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी या फिचरचा उपयोग करता येईल. यामध्ये लोकेशनची माहिती लपवून ठेवण्याचीही सुविधा आहे. यामुळे तुम्ही कुठे आहात हे इतरांना कळणार नाही. 

मागील वर्षी डिसेंबरमध्ये व्हॉट्स अ‍ॅपने पाठवलेले मेसेज संपादित करण्याची सुविधा सुरू केली होती. हे फिचर सध्या व्हॉट्स अ‍ॅप आयओएस २.१७.१.८६९ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. 

Web Title: TECH: Now keep an eye on friends through the What's App!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.