TECH : ​आता ‘जीमेल’वर लाइव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंगची सुविधा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 11:18 AM2017-03-24T11:18:14+5:302017-03-24T16:48:14+5:30

विविध सोशल मीडियावर सुुरू झालेल्या लाइव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंगची सुविधा आता आपणास ‘जीमेल’वरही अनुभवता येणार आहे. या सुविधेअंतर्गत ई-मेलमधून आलेल्या ‘व्हिडिओ अ‍ॅटॅचमेंट’ची संक्षेप प्रतिमा दिसल्यावर त्यावर डबल क्लिक करताच संबंधित ‘व्हिडिओ’ प्ले होईल

Tech: Now live video streaming facility on 'Gmail'! | TECH : ​आता ‘जीमेल’वर लाइव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंगची सुविधा!

TECH : ​आता ‘जीमेल’वर लाइव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंगची सुविधा!

Next
विध सोशल मीडियावर सुुरू  झालेल्या लाइव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंगची सुविधा आता आपणास ‘जीमेल’वरही अनुभवता येणार आहे. या सुविधेअंतर्गत ई-मेलमधून आलेल्या ‘व्हिडिओ अ‍ॅटॅचमेंट’ची संक्षेप प्रतिमा दिसल्यावर त्यावर डबल क्लिक करताच संबंधित ‘व्हिडिओ’ प्ले होईल. विशेष म्हणजे, या व्हिडिओचा वेग, आवाजाची मर्यादा बदलणेही वापरकर्त्यांना शक्य होईल. शिवाय ‘क्रोमकास्ट’वरदेखील हा व्हिडिओ पाहणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे यूजर्सचा खर्च होणारा वेळ आणि डेटा वाचणार आहे. या सुविधेमुळे वापरकर्त्यांच्या संगणक किंवा लॅपटॉपवरील स्टोअरेज क्षमतेवर ताण पडणार नाही. येत्या काही आठवड्यात ही सुविधा जीमेलच्या करोडो वापरकर्त्यांना उपलब्ध होईल.
व्हिडिओची लांबी ही ५० एमबी एवढीच मर्यादित असल्यामुळे उच्च दर्जाचा व्हिडिओ पाहणे शक्य नसून केवळ स्मार्टफोनच्या माध्यमातून पाठवलेला व्हिडिओ पाहता येणार आहे. शिवाय उच्च दर्जाच्या व्हिडिओसाठी गुगल ड्राइव्ह ही सुविधा यापूर्वीच देण्यात आलेली आहे.

Web Title: Tech: Now live video streaming facility on 'Gmail'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.