TECH : आता सेल्फीच बनेल पासवर्ड !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2017 11:22 AM2017-02-04T11:22:38+5:302017-02-04T17:04:01+5:30
आता पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही. सेल्फी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये लॉगइन करण्यासाठी पासवर्डचे काम करणार असल्याचे संशोधन सुरु केले आहे.
Next
स ्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांमध्ये सेल्फीची क्रेझ दिसत आहे. नेमकी हीच क्रेझ ओळखून विविध नामांकित कंपन्यांनी आपल्या मोबाइलद्वारे काढलेला सेल्फी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये लॉगइन करण्यासाठी पासवर्डचे काम करणार असल्याचे संशोधन सुरु केले आहे. म्हणजे आता पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही. सेल्फीच आपला पासवर्ड होणार असून आॅनलाईन शॉपिंग, डॉक्टरच्या अपॉइंटमेंट्स तसेच येणाºया काळात बँकिंगसहित अनेक कामांसाठी सेल्फीचा वापर करण्यात येईल.
आगामी काळात बँकेचे व्यवहारात सेल्फी सिक्युरीटी पासवर्ड म्हणून वापरला जाईल. याव्यतिरिक्त आॅनलाईन खरेदी करताना विक्रेते सेलफीद्वारे तुमच्या पूर्ण शरीराचे फोटो घेऊन त्यानुसार तुमच्या आकाराचे कपडे किंवा वस्तू दाखवतील.
एका मोबाइल कंपनीचे म्हणणे आहे की, 'जेव्हा आम्ही स्मार्टफोन बनवतो त्यावेळी सुविधेसोबतच भविष्यातील आव्हाने व बदलांचाही अभ्यास करतो. कुठल्याही स्मार्टफोनसाठी त्याचा कॅमेरा एक महत्वाचा भाग असतो. म्हणून आम्ही उत्तम फ्रंट कॅमेरा देण्याच्या प्रयत्नात असतो.'
Also Read : चुकूनही ठेवू नका हे पासवर्ड !
: पासवर्ड गुपित ठेवाच !