TECH : आता ‘स्मार्टफोन’ करणार शरीराची तपासणी !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2017 10:41 AM2017-03-19T10:41:42+5:302017-03-19T16:11:42+5:30

या स्मार्टफोनच्या मदतीने इसीजी, रक्तदाब, शरिराचे तापमान आदींचे मापन करता येते. एवढेच नव्हे तर त्याच्या मदतीने एखादा व्यक्ती दारू पिलेला आहे का? याची माहितीदेखील मिळू शकते.

TECH: Now 'Smartphone' body checks! | TECH : आता ‘स्मार्टफोन’ करणार शरीराची तपासणी !

TECH : आता ‘स्मार्टफोन’ करणार शरीराची तपासणी !

Next
ा कंपनीने इसीजीसह शरीराच्या विविध तपासणी करण्यास सक्षम असणारा स्मार्टफोन विकसित केला असून तो लवकरच बाजारपेठेत सादर होणार आहे.
या कंपनीने बार्सिलोना येथील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपला आयएलए टी-१ या स्मार्टफोनची प्रतिकृती प्रदर्शित केली होती. फिचर्सचा विचार करता हा मध्यम रेंजमधील स्मार्टफोन असल्याचे दिसून येते. मात्र याची खासियत म्हणजे यात शरीर तपासणीचे विविध फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. 

याच्या मागील बाजूस अतिशय उत्तम दर्जाचे सेन्सर्स लावण्यात आले आहेत. याच्या मदतीने इसीजी, रक्तदाब, शरिराचे तापमान आदींचे मापन करता येते. एवढेच नव्हे तर त्याच्या मदतीने एखादा व्यक्ती दारू पिलेला आहे का? याची माहितीदेखील मिळू शकते. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. आॅक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसरने सज्ज असणाऱ्या या मॉडेलची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असेल. यातील कॅमेरे १३ आणि ८ मेगापिक्सल्सचे तर बॅटरी ३४२० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. येत्या काही महिन्यांमध्ये हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

 

Web Title: TECH: Now 'Smartphone' body checks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.