TECH : आता ‘यूट्यूब टीव्ही’ येणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 01:14 PM2017-03-22T13:14:01+5:302017-03-22T18:44:01+5:30

यूजर्सची आॅनलाइन आणि आॅफलाइन व्हिडिओ पाहण्याची सर्वाधिक पसंती असेलेले यूट्यूब आता टीव्ही क्षेत्रात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.

TECH: Now 'youtube tv' will come! | TECH : आता ‘यूट्यूब टीव्ही’ येणार !

TECH : आता ‘यूट्यूब टीव्ही’ येणार !

Next
जर्सची आॅनलाइन आणि आॅफलाइन व्हिडिओ पाहण्याची सर्वाधिक पसंती असेलेले यूट्यूब आता टीव्ही क्षेत्रात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे हा टीव्ही चालविण्यासाठी गुगलने व्हिडिओज उपलब्ध करण्यासाठी ४० विविध नेटवर्क्सशी सहकार्य करार केले आहेत. या माध्यमातून लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि केबल फीड्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे गुगल आता आॅनलाइल टीव्हीच्या स्पर्धेत उतरणार आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्सपेक्षा वेगळा असून त्यात  टीव्हीवर सर्व वाहिन्या जशाच्या तशा दाखविल्या जाणार आहेत. त्यातुलनेने नेटफ्लिक्समध्ये विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमांचे संकलन आहे. अजून एक विशेष म्हणजे यूट्यूब हे अ‍ॅप मोबाइलसाठी विकसित करण्यात आले आहे. यामध्ये अमर्यादित क्लाऊड डीव्हीआर साठवणूक देण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही तुमची आवडती मालिका किंवा एखादा सामना तुमच्या पसंती पयार्यात साठवून ठेवू शकतात. ही सेवा सुरुवातीला अमेरिकेत ३५ डॉलर्स दरमाह इतक्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र नेटफ्लिक्सच्या तुलनेत ही सेवा महाग असून यामध्ये सीएनएनसारख्या महत्त्वाच्या वाहिन्यांचा समावेश नसल्याने ग्राहक याला किती पसंती देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, तर भारतात हा टीव्ही कधी दाखल होईल याबाबत अजून कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही

Web Title: TECH: Now 'youtube tv' will come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.