​Tech : मोबाइलमध्ये ‘प्रायव्हेट’ फोटो लपविण्याच्या या आहेत खास टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2017 09:11 AM2017-06-01T09:11:02+5:302017-06-01T14:41:02+5:30

आपल्या व्यतिरिक्त ते फोटो कोणीही पाहू शकतील. जर आपल्याला हे फोटोज लपवायचे असतील तर आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत.

Tech: These are special tips for hiding the 'private' photo in mobile! | ​Tech : मोबाइलमध्ये ‘प्रायव्हेट’ फोटो लपविण्याच्या या आहेत खास टिप्स !

​Tech : मोबाइलमध्ये ‘प्रायव्हेट’ फोटो लपविण्याच्या या आहेत खास टिप्स !

Next
ुतेकजणांकडे स्मार्टफोन आहेच. या स्मार्टफोनचा वापर आता फक्त एकमेकांशी बोलण्यासाठी केला जात नाही, तर त्यात बरीच महत्त्वाची डॉक्यूमेंट्स किंवा प्रायव्हेट फोटो सेव्ह केले जाऊ शकतात. यामुळे स्मार्टफोनला एक पॉकेट कंप्यूटरदेखील म्हटले जाऊ शकते. विशेष म्हणजे फोटोज आणि व्हिडिओसाठी स्मार्टफोन एक अप्रतिम पर्सनल डिवाइस आहे. यात आपण सर्व प्रायव्हेट फोटोज सेव्ह करू शकतो. मात्र जर हे फोटोज फोनच्या मुख्य अल्बममध्ये दिसू लागले तर आपल्या व्यतिरिक्त ते फोटो कोणीही पाहू शकतील. जर आपल्याला हे फोटोज लपवायचे असतील तर आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत. 
आपण गूगल फोटोजद्वारे हे फोटोज लपवू शकता. त्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया. 

* सर्वप्रथम आपल्या फोनमधील गूगल फोटोज अ‍ॅपला ओपन करावे. त्यानंतर फोनच्या गॅलरीमध्ये जावे. 

* यानंतर आपल्याला जो फोटो लपवायचा आहे त्या फोटोंना सिलेक्ट करावे. 

* फोटोज सिलेक्ट केल्यानंतर वर दिलेल्या मेन्यू मध्ये जावे. सिलेक्ट केलेले सर्व फोटो आर्काइव्ह मध्ये मूव्ह करावे. 

* जसेही आपण फोटोंना आर्काइव्ह मध्ये मूव्ह कराल ते फोटो मुख्य अल्बममधून रीमूव्ह होतील. आणि हे सर्व फोटो आपल्याला आर्काइव्ह फोल्डरमध्ये दिसतील. 

या चार स्टेप्सने आपण आपले प्रायव्हेट फोटो लपवू शकता.  
 

Web Title: Tech: These are special tips for hiding the 'private' photo in mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.