TECH :​भारतात ‘ट्विटर लाइट’ सुविधा सुरु, ७० टक्के डेटा वाचवता येणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2017 11:50 AM2017-04-08T11:50:51+5:302017-04-08T17:20:51+5:30

जगभरात लोकप्रिय ठरलेली मायक्रो ब्लॉगिंग साईट म्हणजेच ट्विटरने आपल्या यूजर्ससाठी ‘ट्विटर लाइट’ ही सुविधा आणली

TECH: 'Twitter Lite' facility in India, 70 percent data can be saved! | TECH :​भारतात ‘ट्विटर लाइट’ सुविधा सुरु, ७० टक्के डेटा वाचवता येणार !

TECH :​भारतात ‘ट्विटर लाइट’ सुविधा सुरु, ७० टक्के डेटा वाचवता येणार !

Next
ong>-Ravindra More
जगभरात लोकप्रिय ठरलेली मायक्रो ब्लॉगिंग साईट म्हणजेच ट्विटरने आपल्या यूजर्ससाठी ‘ट्विटर लाइट’ ही सुविधा आणली असून यामुळे यूजर्सला सुमारे ७० टक्के डेटा वाचवता येणार आहे. शिवाय ३० टक्के अधिक वेगाने कंटेंट अपलोड करता येणार आहे. ही सेवा ट्विटरने गुगलच्या मदतीने विकसित केली आहे.
ट्विटरने भारतात सर्वप्रथम ही सेवा सुरू केली असून त्यानंतर इंडोनेशिया आणि फिलिपाइन्समध्ये लवकरच ही सेवा सुरू केली जाणार आहे. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ, गुजराती या सहा भारतीय भाषांसह ४२ भाषांमध्ये ट्विटर लाइट उपलब्ध असणार आहे. ट्विटर लाईट ही सेवा वेब ब्राऊजरच्या माध्यमातून वापरता येणार आहे. पण ट्विटरच्या अ‍ॅपच्या फिचर्ससारखेच सगळे फिचर्स यात वापरता येणार आहेत. 
ट्विटरच्या व्यवस्थापकीय संचालिका माया हरी यांनी भारतीय बाजारपेठ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. ट्विटरची सेवा सर्वांना मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असून ट्विटर लाइट हे त्यादिशेने टाकलेले महत्त्वाकांक्षी पाऊल आहे, असे त्या म्हणाल्या.
 
ट्विटर लाइटची वैशिष्ट्ये:
* हे प्रोग्रेसिव्ह वेब अ‍ॅप गुगलच्या सहकायार्ने बनवण्यात आले आहे.
* डायरेक्ट मेसेज, सर्च बटन, फिड यासह अँड्रॉइड मोबाइलवर नोटिफिकेशन पाठवण्यासाठी खास फिचर.
* मोबाइल आणि डेस्कस्टॉपवरही हे अ‍ॅप वापरता येईल.
* mobile.twitter.com या साइटवर तुम्हाला लॉग इन करावं लागेल.
* क्रिकेटप्रेमींसाठी हे अ‍ॅप पर्वणी ठरणार आहे. ‘क्रिकबझ’ या कंटेंट पार्टनरच्या माध्यमातून टी-२० सामन्यांचे ताजे अपडेट्स, सामन्यांदरम्यानच्या महत्त्वाच्या घडामोडी यूजर्सना कळणार आहेत. 

Web Title: TECH: 'Twitter Lite' facility in India, 70 percent data can be saved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.