TECH : मोबाइलमध्ये ‘रिसायकल बिन’चा असा करा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2017 10:31 AM2017-06-11T10:31:05+5:302017-06-11T16:01:05+5:30

कंप्यूटरसारखे आपण आपल्या अ‍ॅण्ड्रॉइड फोनमध्येही रिसायकल बिनचा वापर करु शकता आणि फोनमधून डिलीट झालेली फाइल पुन्हा वापस घेऊ शकता.

TECH: Use this as a Recycle Bin in mobile! | TECH : मोबाइलमध्ये ‘रिसायकल बिन’चा असा करा वापर !

TECH : मोबाइलमध्ये ‘रिसायकल बिन’चा असा करा वापर !

Next
प्यूटरवर काम करीत असताना नकळत एखादी फाइल डिलीट झाली तर आपण लगेच रिसायकल बिनमधून ती फाइल वापस घेऊ शकतो. म्हणून कंप्यूटरवर आपण निश्चिंत काम करतो. मात्र मोबाइलच्या बाबतीत तसे नाही. मोबाइलवर काम करीत असताना काही डिलीट झाले तर मोठी समस्या निर्माण होते. कारण मोबाइलमध्ये एकदा डिलीट झालेले पुन्हा वापस येत नाही. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. आम्ही आपणास खास टिप्स देत आहोत, ज्याच्या साह्याने आपण मोबाइलमधून एकदा डिलीट झालेले पुन्हा मिळवू शकता. 
कंप्यूटरसारखे आपण आपल्या अ‍ॅण्ड्रॉइड फोनमध्येही रिसायकल बिनचा वापर करु शकता आणि फोनमधून डिलीट झालेली फाइल पुन्हा वापस घेऊ शकता. यासाठी आपणास फोनमध्ये ‘डंपस्टेर’ अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. 
या अ‍ॅपचे खास वैशिष्टे म्हणजे हे डाउनलोड होताच काम करायला लागते. जसेही आपण हे अ‍ॅप डाउनलोड कराल स्क्रिनवर आपणास कोणकोणत्या फाइल्सचा बॅकअप घ्यायचा आहे, असा एक संदेश दिसेल. यात आपणास आॅडिओ, व्हिडिओ आणि इमेजसह अन्य पर्यायदेखील दिसतील. बॅकअपची निवड केल्यानंतर एक-दोन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे अ‍ॅप काम सुरु करेल.  

Web Title: TECH: Use this as a Recycle Bin in mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.