TECH : व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये पहा व्हिडीओ आणि फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2017 01:10 PM2017-02-24T13:10:59+5:302017-02-24T18:40:59+5:30

व्हॉट्सअॅपच्या बोरिंग स्टेटसला करा बाय बाय, त्यात आता पहा व्हिडीओ आणि फोटो !

TECH: Watch videos and photos in WhatsappApps! | TECH : व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये पहा व्हिडीओ आणि फोटो !

TECH : व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये पहा व्हिडीओ आणि फोटो !

Next
शल मीडिया युजर्समध्ये लोकप्रिय असलेलं मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने गतवर्षी अनेक नवे फिचर्स आणले आहेत. यावर्षीदेखील व्हॉट्सअॅपने एक नवीन बदल केला असून यामुळे काय स्टेटस टाकू? असा प्रश्न पडणा-या युजर्सना या नव्या फिचरचा फायदा होणार आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस फिचरमध्ये बदल करत असून यामुळे युजर्सना स्टेटसमध्ये फक्त टेक्स्ट न टाकता फोटो, व्हिडीओ आणि GIF टाकणं शक्य होणार आहे.  
 
सध्या व्हॉट्सअॅपमध्ये 'Hey there, I'm using WhatsApp' हा डिफॉल्ट स्टेटस उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपवर एकतर तुम्ही उपलब्ध असलेल्यांपैकी एखादा स्टेटस ठेवू शकता, किंवा तुमच्या भावना लिहून त्या टेक्स्ट स्वरुपात ठेवू शकता. जास्तीत जास्त त्यात स्माईली वापरुन स्टेटस आकर्षक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण आता या कंटाळवाण्या आणि रटाळ स्टेटसपासून सुटका मिळेले. खासकरुन ज्यांना वारंवार आपला स्टेटस बदलायचा असतो त्यांच्यासाठी तर हे खूपच मनोरंजक असणार आहे. 
 
या नव्या फिचरमुळे व्हॉट्सअॅप स्टेसमध्ये टेक्स्टच्या ऐवजी एक छोटा व्हिडीओ टाकणं शक्य होणार आहे. सध्या ही सोय किंवा फिचर इंस्टाग्रामवर (Instagram Stories) उपलब्ध असून स्नॅपचॅटशी मिळतं जुळतं आहे. आता व्हॉट्सअॅपवर फोटो, व्हिडीओ, GIF शेअर करणं शक्य होणार असून सर्वजण ते पाहू शकतात. विशेष म्हणजे आपल्या स्टेटसवर मित्र कमेंट करु शकतात, जे फक्त आपल्यालाच दिसणार. मित्रांची कमेंट चॅटच्या माध्यमातून आपल्याल येईल, त्यावेळी त्याने कोणत्या स्टेटसवर कमेंट केली आहे हेदेखील पाहायला मिळेल. हे व्हॉट्सअॅप स्टेटस 24 तासानंतर आपोआप गायब होईल.    
 
स्टेटस अपडेट करण्यासाठी मेन्यूत जाण्याची गरज राहणार नसून चॅट्स आणि कॉल्समध्ये त्यासाठी वेगळा पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे. डिफॉल्ट सेटिंगनुसार आपले सर्व मित्र स्टेटस पाहू शकतात. पण जर काही ठराविक लोकांनाच तो दिसावा असं वाटत असेल तर तेही शक्य आहे. तसंच आपला स्टेटस कोणी वाचला हेदेखील पाहू शकतो. त्याचप्रमाणे गेल्या 24 तासांत मित्राने कोणते स्टेटस ठेवले होते हेदखील कळू शकतं. पण आपण ते डिलीट केल्यास मित्रांना ते पाहता येणार नाही. 
 
व्हॉट्सअॅपने हे फिचर युरोपमध्ये सुरु केलं असून इतर देशांमध्ये लवकरच सुरु करणार आहे. लवकरच हे फिचर अॅड्रॉईड, आयफोन आणि विंडोज युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Web Title: TECH: Watch videos and photos in WhatsappApps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.