TECH : यू ट्यूबवरील व्हिडिओ पाहा इंटरनेट शिवाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 12:59 PM2017-02-10T12:59:27+5:302017-02-10T18:29:27+5:30

यू ट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यास खूप डेटा खर्च होतो त्यामुळे हे अ‍ॅप लो डेटा प्लानसाठी वरदान ठरणार आहे. डाउनलोड होण्यापूर्वीच आपल्याला समजू शकेल की किती डेटा खर्च होणार आहे.

TECH: Watch videos on YouTube without internet! | TECH : यू ट्यूबवरील व्हिडिओ पाहा इंटरनेट शिवाय!

TECH : यू ट्यूबवरील व्हिडिओ पाहा इंटरनेट शिवाय!

Next
ong>-Ravindra More

स्मार्टफोन, टॅब किंवा संगणकावर व्हिडिओ पाहायचा असेल तर यू ट्यूब हा उत्तम पर्याय आहे. मात्र व्हिडिओ पाहत असताना जास्त डाटा खर्च होत असल्याने बरेचजण या सुविधेपासून चारहात लांब राहतात. पण आता यापुढे युट्युबवर आॅफलाइन म्हणजेच इंटरनेट शिवाय व्हिडिओ पाहता येणार आहे. 

गुगलतर्फे नुकतेच ‘यू ट्यूब गो बिटा’ अ‍ॅप लाँच केले आहे. ज्या लोकांनी बिटा वर्जनला सबस्क्राइब केले आहे त्यांना ‘यू ट्यूब गो’ हे अ‍ॅप पूर्णपणे वापरता येणार आहे. ‘यू ट्यूब गो’ वर आपण व्हिडिओ सेव्ह करुन ठेऊ शकतो आणि जेव्हा आपण आॅफलाइन असू तेव्हा ते पाहता येतात. यामुळे डेटा सेव्हिंग होते असे गुगलने म्हटले आहे. यू ट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यास खूप डेटा खर्च होतो त्यामुळे हे अ‍ॅप लो डेटा प्लानसाठी वरदान ठरणार आहे. डाउनलोड होण्यापूर्वीच आपल्याला समजू शकेल की किती डेटा खर्च होणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ सेव्ह करायचा की नाही याचा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असेल. यू ट्यूब गो वर ६४० पी या क्वॉलिटीवरच व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहे. बेसिक आणि स्टँडर्ड व्हिडिओ क्वालिटी हे दोन पर्याय युट्युबवर डाउनलोडसाठी उपलब्ध असतात परंतु युट्युब गो या अ‍ॅपवर दोन्ही पयार्यांचा उपयोग नाही. तेव्हा कमी क्वालिटीचाच व्हिडिओ डाउनलोड होतो आणि पयार्याने तुमचा डेटा वाचतो.

जर चांगल्या गुणवत्तेचा व्हिडिओ हवा असेल तर यू ट्यूब अ‍ॅपवरुन तो केव्हाही डाउनलोड करता येतो. सप्टेंबरमध्ये यू ट्यूब गो बाबतची घोषणा गुगलने केली होती. परंतु त्याचे भारतामध्ये पदार्पण होण्यास उशीर झाला. भारतामध्ये डेटा कनेक्टिव्हिटीमध्ये अनेक समस्या आहेत. ही समस्या या अ‍ॅपच्या येण्याने दूर होईल असा विश्वास निर्मात्यांना आहे. या व्यतिरिक्त युट्युब गो मध्ये क्विक प्रिव्ह्यू हा पर्याय देखील उपलब्ध आहे. यामुळे व्हिडिओ पाहण्यापूर्वी तो कसा आहे याची झलकही आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तो व्हिडिओ डाउनलोड करायचा की नाही याचा निर्णय घेता येऊ शकतो.  होमस्क्रीनवर लोकप्रिय व्हिडिओ आमि जाहिराती दिसतील. प्रत्येक व्हिडिओ डाउनलोड करण्यापूर्वी किती डेटा खर्च होईल हे आपल्याला समजेल. आपल्या आजूबाजूला असलेल्या मित्रांसोबतही आपण हे व्हिडिओ शेअर करू शकतो. वाय-फाय डायरेक्टचा वापर करुनही आपण हे अ‍ॅप वापरू शकतो.

Web Title: TECH: Watch videos on YouTube without internet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.