Tech : व्हॉट्सअॅपबाबत ‘या’ १० अमेजिंग गोष्टी जाणून व्हाल चकित !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2017 01:20 PM2017-06-08T13:20:37+5:302017-06-08T18:53:06+5:30
व्हॉट्सअॅपच्या बाबतीत अशा काही अमेजिंग गोष्टी आहेत त्या आपणास माहित नाहीत. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत.
Next
सोशल मीडियात व्हॉट्सअॅपचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅप आहेच आणि आपण सकाळपासून रात्रीपर्यंत व्हॉट्सअॅपचा वापर नचुकता करतो. मात्र व्हॉट्सअॅपच्या बाबतीत अशा काही अमेजिंग गोष्टी आहेत त्या आपणास माहित नाहीत.
चला जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत.
* व्हॉट्सअॅपला २००९ मध्ये Jan Koum आणि Brian Actom यांनी बनविले होते.
* व्हॉट्सअॅपची प्रोग्रॅमिंग ‘Erlang’ प्रोग्रॅमिंग भाषेत करण्यात आली आहे.
* जॅन कोम आणि ब्रायन अॅक्टोन दोघेही याहूचे माजी कर्मचारी होते.
* आपणास असे वाटत असेल की, व्हॉट्सअॅपमध्ये हजारो कर्मचारी काम करीत असतील तर असे अजिबात नाही. हे जगातील नंबर एकचे इन्स्टंट मॅसेजिंग अॅपच्या कार्यालयात आतादेखील फक्त ५० कर्मचारी काम करतात.
* व्हॉट्सअॅप जवळपास सर्वच मोबाइल प्लेटफार्मसाठी बनविण्यात आले आहे, ज्यात आयओएस सिम्बियन, अॅँड्राइड, ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी १०, विंडोज फोन, नोकिया सीरीज ४० आणि फायरफॉक्स ओएसचा समावेश आहे.
* व्हॉट्सअॅपचा वापर सुमारे १८० पेक्षा जास्त देशात १ अरबपेक्षा जास्त लोक करीत आहेत.
* व्हॉट्सअॅप बनविण्याची कल्पना Jan Koum आणि Brian Actom यांचे मित्र एलेक्स फिशमॅनच्या घरात एका पिज्जा पार्टीत सुचली होती.
* व्हॉट्सअॅपने आपल्या मार्केटिंगसाठी एकही पैसा खर्च केला नाही.
* विकीपीडियासारखेच व्हॉट्सअॅपवर आतापर्यंत एकही जाहिरात दाखविण्यात आली नाही.
* मार्क झुकरबर्ग व्हॉट्सअॅपच्या लोकप्रियतेवर एवढे प्रभावित झाले की त्यांनी व्हॉट्सअॅपला १९ अरब डॉलरमध्ये खरेदी केले.