TEDDY DAY SPECIAL : कुठल्या रंगाचा टेडी काय दर्शवितो !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 07:17 AM2017-02-10T07:17:05+5:302017-02-10T13:50:59+5:30
10 फेब्रुवारीला टेडी डे आहे. जर आपल्या गर्लफ्रेंडचे मन जिंकायचे असेल तर आपण एक आकर्षक टेडी गिफ्ट देऊ शकता. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
Next
10 फेब्रुवारीला टेडी डे आहे. जर आपल्या गर्लफ्रेंडचे मन जिंकायचे असेल तर आपण एक आकर्षक टेडी गिफ्ट देऊ शकता. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. या दिवशी दिलेला एक लहानसा टेडी आपल्या नात्यातील दुरावा दूर करु शकतो आणि जवळीकता वाढवू शकतो. टेडी नात्यात सॉफ्टनेस आणि क्यूटनेस आणतो. नात्यात गोडवा आणण्यासाठी आपण टेडी डे साजरा करतो. यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगाचे आकर्षक टेडी उपलब्ध असतात, मात्र कोणत्या रंगाचा टेडी काय दर्शवितो आपणास माहित आहे का? हे आज आपण जाणून घेऊया.
काय दर्शवितो आपल्या टेडीचा रंग
आपल्या टेडीचा रंग आपल्या पार्टनरसोबतच्या नात्याला दर्शवितो. आपण टेडी डेला वेगवेगळ्या रंगाचे टेडी गिफ्ट करतो. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या रंगाचा टेडी काय दर्शवितो.
* बेबी पिंक टेडी
बेबी पिंक रंगाचा टेडी मुलींना जास्त आवडतो. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी बेबी पिंक रंगाचे टेडी दिले जाते.
* लाल टेडी
जेव्हा आपले नाते मजबूत होते किंवा आपणास आपले प्रेम व्यक्त करायचे असेल तेव्हा लाल रंगाचा टेडी द्यावा.
* पांढरा टेडी
पांढऱ्या रंगाचा टेडी आपल्या पार्टनरला मनविण्यासाठी दिला जातो.
* पीच टेडी
पीच रंगाचा टेडी पती-पत्नी एकमेकांना देतात.
* फिकट रंगाचा टेडी
फिकट रंगाचा टेडी आपली मुले आई-वडिलांना देतात.
टेडी देताना काय काळजी घ्याल
आपले टेडी जास्त गडद रंगाचे नको. आपणास आपल्या पार्टनरला एक फिकट गुलाबी किंवा लाल रंगाचे टेडी द्यायला हवे कारण लाल रंग प्रेमाचे प्रतिक आहे. शिवाय जे वॉशेबल आहे तेच टेडी घ्यावे. तसेच त्यावर धुळ, माती लागलेली नसावी. जर आपल्या पार्टनरला एक हार्टशेपचा टेडी दिला तर अधिक उत्तम.
Also Read : TEDDY DAY SPECIAL : नात्यात जवळीकता आणते ‘टेडी बेअर’ !