​सहा प्रकारे होऊ शकते आॅनलाईन फसवणूक !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2017 11:00 AM2017-01-31T11:00:56+5:302017-01-31T16:30:56+5:30

वेगवेगळ्या माध्यमातून हॅकर्स लोकांची फसवणूक करताना दिसत आहेत. यापैकी महत्त्वाचे सहा असे प्रकार आहेत ज्यातून सामान्य लोकांची जास्त फसवणूक होताना दिसते.

There can be six ways in the online fraud! | ​सहा प्रकारे होऊ शकते आॅनलाईन फसवणूक !

​सहा प्रकारे होऊ शकते आॅनलाईन फसवणूक !

Next
ong>-Ravindra More

नोटाबंदी नंतर डिजीटल आणि कॅशलेस व्यवहार बऱ्यापैकी वाढलेला दिसतो. याचबरोबर हॅकर्सदेखील मोठ्याप्रमाणात सक्रीय झालेले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून हॅकर्स लोकांची फसवणूक करताना दिसत आहेत. यापैकी महत्त्वाचे सहा असे प्रकार आहेत ज्यातून सामान्य लोकांची जास्त फसवणूक होताना दिसते. 

फिशिंग 
सध्या हॅकर्स फिशिंगचा जास्तच वापर करीत आहेत. फिशिंगमध्ये आपणास एक स्पॅम मेल पाठविण्यात येतो आणि यूजरला वाटते की हा मेल रियल सोर्सतर्फे आला आहे. नेमके याद्वारेच यूजरची माहिती चोरली जाते. 

विशिंग 
फिशिंगप्रमाणेच विशिंगदेखील सध्या खूप वाढत आहे. यात फोन कॉल किंवा एसएमएसद्वारे गप्पांमध्ये फसविले जाते. यानंतर आपल्या खात्याची माहिती घेऊन आपली फसवणूक केली जाते. 

अनसेफ अ‍ॅप्स
तिसरा सर्वात मोठा पर्याय म्हणजे फसवे व असुरक्षित अ‍ॅप्स. काही दिवसांपूर्वी सरकारतर्फे बनविण्यात आलेल्या अ‍ॅप्सची नक्कल करीत काही अ‍ॅप फसवे बनविण्यात आले आणि त्याद्वारे लोकांना फसविण्यात आले. यासाठी आॅथेंटिक सोर्सद्वारेच अ‍ॅप डाऊनलोड करावे. 

मॅलवेयर
मॅलवेयरद्वारेही लोकांची मोठी फसवणूक केली जाते. मॅलवेयरचा वापर करुन एटीएम आणि बॅँकेसंबंधी माहिती चोरुन लोकांना लुबाडले जाते. 

कीस्ट्रोक लॉगिंग
हा एक अ‍ॅडव्हान्स पर्याय आहे. यात हॅकर्स यूजर्सला काही पद्धतीने गोंधळात टाकून संगणकात सॉफ्टवेअर टाकतात आणि आपली सर्व माहिती चोरुन नेतात.

फार्मिंग
यात यूजर्सला अगदी खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या नकली वेबसाइटवर नेले जाते. विशेष म्हणजे नेटबॅँकिंग करणारे लोक फार्मिंगचे जास्त शिकार होतात. 

Web Title: There can be six ways in the online fraud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.