​१२ वी कला शाखेतून पास झालेल्यांसाठी या आहेत करिअर संधी !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2017 01:43 PM2017-06-09T13:43:57+5:302017-06-09T19:13:57+5:30

शासकीय तसेच इतर क्षेत्रातही कला शाखेच्या लोकांना वाव आहे. जाणून घ्या त्या संधींविषयी...

These are the career opportunities for those who have passed from 12th AR branch. | ​१२ वी कला शाखेतून पास झालेल्यांसाठी या आहेत करिअर संधी !

​१२ वी कला शाखेतून पास झालेल्यांसाठी या आहेत करिअर संधी !

Next
ुतेक विद्यार्थी आणि पालक करिअर घडविण्यासाठी १२ विज्ञान आणि कॉमर्सची निवड करतात, मात्र आता कला शाखेतही चांगली करिअरची संधी मिळू शकते. कला शाखेतील गुणवत्ताधारक लोकांना विशेषत: नोकऱ्यांची कमी नाही. शासकीय तसेच इतर क्षेत्रातही कला शाखेच्या लोकांना वाव आहे. जाणून घ्या त्या संधींविषयी...

* बॅचलर आॅफ आर्किटेक्चर 
बॅचलर आॅफ आर्किटेक्चर पाच वर्षाचा कोर्स आहे. प्रोफेशनल परीक्षा व रजिस्ट्रेशनपूर्वी या कोर्समध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जाते.
* नोकरीच्या संधी - डिझाईन आर्किटेक्ट, प्रोजेक्ट आर्किटेक्ट

* बॅचलर आॅफ आर्ट्स
हा पारंपारिक पर्याय असला तरी तुम्हाला आवड असलेल्या कला क्षेत्राचा गहन अभ्यास करण्यासाठी बीए करणे सर्वात उत्तम आहे. इतिहास, मनोविज्ञान, भूगोल, लोक प्रशासन, साहित्य इत्यादि असंख्य विषयात बीए करता येते. स्पर्धा परीक्षा देणाºयांसाठी बीए हा नेहमीच उत्तम पर्याय आहे. 
* नोकरीच्या संधी - शिक्षक, प्राध्यापक, लेखन क्षेत्र किंवा विशिष्ट विषयातील खात्यांमध्ये नोकरीच्या अनेक संधी.

* बॅचलर आॅफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन
या तीन वर्षांच्या डिग्री अभ्यासक्रमात विविध व्यावसायिक विषयांचा अभ्यास करता येतो. 
* नोकरीच्या संधी - मार्केटिंग अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी

* बॅचलर आॅफ सोशल वर्क  
बॅचलर आॅफ सोशल वर्क हा तीन वर्षांचा कोर्स आहे. ज्यांना एनजीओ, सीएसआर किंवा स्वतंत्रपणे सामाजिक कार्य करण्याची आवड आहे त्यांना या क्षेत्राचे ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्यासाठी हा कोर्स उपयोगी आहे. 
* नोकरीच्या संधी - सोशल वर्कर, समुपदेशक, एनजीओ क्षेत्र

Web Title: These are the career opportunities for those who have passed from 12th AR branch.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.