ह्या आहेत आरोग्यासाठी सर्वात धोकादायक नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2016 03:57 PM2016-07-15T15:57:34+5:302016-07-15T21:27:34+5:30

पुढील नऊ ठिकाणी कामे करणे आरोग्यासाठी सर्वात धोकादायक असते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

These are the most dangerous jobs for health | ह्या आहेत आरोग्यासाठी सर्वात धोकादायक नोकऱ्या

ह्या आहेत आरोग्यासाठी सर्वात धोकादायक नोकऱ्या

Next
च्या स्पर्धेच्या युगात तणाव ही फार कॉमन समस्या झाली आहे. परंतु यामुळे आपल्या आरोग्यावर होणाऱ्या हानीकारक परिणांमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा कोणत्या नोकऱ्या आहेत जेथे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला सर्वाधिक हानी पोहचते हे जाणून घेण्यासाठी अमेरिकेत एक सर्वेक्षण करण्यात आले. तणाव, कामाचे तास आणि कामाच्या ठिकाणी असणारे धोके या तीन मापदंडावर हे सर्वेक्षण केले गेले.

‘एनपीआर’ने केलेल्या १६०० कर्मचाऱ्यांच्या या सर्व्हेतून पुढील नऊ ठिकाणी कामे करणे आरोग्यासाठी सर्वात धोकादायक असते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

१. रिटेल आऊटलेट - २६ %

२. बांधका/उघड्या जागी करावे लागणारे काम - २३ %

३. कारखाने - २१ %

४. मेडिकल - १९ %

५. दुका
ने - १६ %

६. गोदाम - १५ %

७. हॉटेल्स - १३ %

८. आॅफिस - १३ %

९. शाळा - १० %


सुमारे ४३ टक्के लोकांनी  मान्य केले की, नोकरीचा त्यांच्या तणाव पातळीवर नकारात्मक परिणाम पडतो. आणि जे नोकरीमुळे तणावात वावरतात त्यांपैकी ८५ टक्के जणांनी सांगितले की, त्यांची कंपनी या समस्येकडे विशेष असे लक्ष देत नाही. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या दोनतृतांश लोकांनी सांगितले की, त्यांना महिन्यातून अनेक वेळा ओव्हरटाईम किंवा सुटीच्या दिवशीही काम करावे लागते. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी सांगितले की, त्यांना असलेले सगळेच ‘पेड हॉलिडे’ ते अतिरिक्त कामामुळे घेऊ नाही शकत.

Web Title: These are the most dangerous jobs for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.