विशीतील तरुणांमध्ये हवेत हे गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:11 AM2016-01-16T01:11:04+5:302016-02-06T05:18:40+5:30

कुमारवयातील अल्लडपणा जाऊन 20 व्या वर्षात प्रवेश झाला की आपल्या आयुष्याची दिशा स्पष्ट व्हायला लागते....

These qualities in the air of young people in the air | विशीतील तरुणांमध्ये हवेत हे गुण

विशीतील तरुणांमध्ये हवेत हे गुण

Next
मारवयातील अल्लडपणा जाऊन 20 व्या वर्षात प्रवेश झाला की आपल्या आयुष्याची दिशा स्पष्ट व्हायला लागते. यावेळी लागलेल्या सवयी आपल्या जीवनाला कायमस्वरूपी आकार देणार्‍या असतात. म्हणूनच आनंदी आणि परिपूर्ण आयुष्यासाठी विशीतील प्रत्येक तरुणामध्ये पुढील गुण असायलाच पाहिजे. १. प्रामाणिकपणा
आपल्या व्यक्तित्वाचा सर्वात मोठा अलंकार म्हणजे प्रामाणिकपणा. तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमची विश्‍वासहर्ता वाढते. एखाद्या ठिकाणी तुम्ही उशिरा पोहचला तर खोटे कारण सांगण्याऐवजी खरं खरं सांगून द्या की तुमचे आजचे नियोजन चुकले. यामुळे खोटं लपविण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.
२. टीका सहन करणे
स्पर्धेत टिकायचे असेल तर टीका सहन करावी लागणार हे अटळ सत्य आहे. दुसर्‍यांनी चूक दाखवून दिली तर चिडू नका. लोकांचे आपल्या बद्दलचे मत जाणून त्यावर आवश्यक ते बदल करणे खर्‍या अर्थाने प्रगतीचा राजमार्ग आहे. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे जे म्हणतात ते उगीच नाही.
३. रागावर नियंत्रण
क्रोध हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू असतो. रागामध्ये आपली ऊर्जा आणि वेळ नाहक खर्च होतो. त्यामुळे रागावू नका. या ऊज्रेला जर योग्य दिशा दिली तर किती तरी अशक्यप्राय गोष्टीं तुमच्या हातून घडण्याची शक्ती मिळते.
४. नकार पचवायला शिका
या वयात सर्वांची भावना 'आज मैं उपर, आसमाँ निचे' अशीच असते. अश स्थितीत पाहिजे ती गोष्ट नाही मिळाली तर हिरमोड होतो. परंतु सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळू नाही शकत. त्यामुळे नकार पचवून नव्या दमाने पुन्हा प्रयत्न करणारेच आयुष्यात यशस्वी होतात.
५. दिलेला शब्द पाळा
शब्दाला जागतो तोच खरा माणूस. 'प्राण जाए पर वचन न जाए' अशी आपली संस्कृती. दुसर्‍यांना दिलेला शब्द, वचन पाळलेच पाहिजे. वचन मोडण्यासारखा गैरप्रकार दुसरा नाही. त्यामुळे जर शक्य नसेल आधीच तसे सांगा. कारण दिलेला शब्द परत नाही घेता येत.

Web Title: These qualities in the air of young people in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.