वॉर्डरोबमध्ये साड्यांची श्रीमंती हवी असेल तर पूर्वेकडच्या आणि पश्चिमेकडच्या या साड्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 07:08 PM2017-08-01T19:08:16+5:302017-08-01T19:17:03+5:30

साड्या घेण्याआधी साड्यांच्या प्रकाराची थोडी माहिती असायला हवी. माहिती असली की आपल्याकडे जो नाही त्या प्रकारातली साडी घेता येते. यामुळे वॉर्डरोबमध्ये साड्या केवळ संख्येनं वाढत नाही तर गुणवत्तेनंही वाढतात.

These varities of saree making your wardrobe really rich | वॉर्डरोबमध्ये साड्यांची श्रीमंती हवी असेल तर पूर्वेकडच्या आणि पश्चिमेकडच्या या साड्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात!

वॉर्डरोबमध्ये साड्यांची श्रीमंती हवी असेल तर पूर्वेकडच्या आणि पश्चिमेकडच्या या साड्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात!

googlenewsNext
ठळक मुद्दे* संपूर्ण भारतभर लोकप्रिय असलेली कांथा साडी टी वस्त्रावर केलेल्या भरतकामाचा प्रकार आहे.* सुंदर रंगसंगती, आकर्षित डिझाइन्समुळे तांत साड्या सुरेख दिसतात.* बोमकाई साडी ओडिशा राज्याची शान आहे.


- सुनिता विग

अनेकजणींना साड्या घेण्याची भारी हौस. आपला वॉर्डरोब कसा साड्यांनी खचाखच भरलेला आवडतो त्यांना. पण आपल्या वॉर्डरोबमध्ये फक्त एकच एक प्रकार असून काय उपयोग? वॉर्डरोबमध्ये व्हरायटी हवी. आता तर सणावारांचे दिवस. नटण्या-मुरडण्याचे आणि मिरवण्याचे दिवस. साड्यांची व्हरायटी वापरून बघण्याचा उत्तम काळ आहे हा. तसेच साड्या घेण्याचं निमित्तही हे सणवार देतात. त्यामुळे साड्या घेण्याआधी साड्यांच्या प्रकाराची थोडी माहिती असायला हवी. माहिती असली की आपल्याकडे जो नाही त्या प्रकारातली साडी घेता येते. यामुळे वॉर्डरोबमध्ये साड्या केवळ संख्येनं वाढत नाही तर गुणवत्तेनंही वाढतात. आणि आपला वॉर्डरोब खर्या अर्थानं समृध्द होतो.
वॉर्डरोब समृध्द आणि श्रीमंत करणारे साड्यांचे हे प्रकार तुम्हाला माहिती आहे का?

पूर्वेकडची साडी समृध्दी

‘कोलकाता’ पूर्व भारताची फॅशन कॅपीटल. ती साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. आपण ज्याला कलकत्ता साडी म्हणतो या तशा खास सुती साड्या व्यतिरिक्तही अनेक प्रकार तिथं वर्षानुवर्ष प्रचलित आहेत.

 

कांथा साडी

संपूर्ण भारतभर लोकप्रिय असलेली कांथा साडी टी वस्त्रावर केलेल्या भरतकामाचा प्रकार आहे. रंगीबिरंगी धागेदोरे द्वारा साधा धावदोरा माध्यमातून साडीला किती सुंदर सुरेख उठाव येवू शकतो हे या कांथा साड्या बघून पटत. कॉटन, अस्सल सिल्क (रेशमी), अलिकडे सिंथेटिक ही कांथा साड्यामध्ये लोकप्रिय आहे. लोककथामधले प्रसंग, राधा-कृष्ण, मीरा, पशु-पक्षी, फुलं-पानं, नक्षीदार वेली, मानवी आकृतीचं भरतकाम कांथावर्कद्वारे वस्त्रावर करून त्यालाच कांथासाडी म्हटलं जातं. पश्चिम बंगालमधील ग्रामीण स्त्रियांना या कांथा साडीच्या लोकप्रियतेमुळे चांगला रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.

 

तांत साडी

कॉटन साडी नेसणार्या महिलांची पहिली पसंती. ‘हॅण्डलूम’ म्हणजे मागावर विणलेली ही साडी तलम आणि सूती असते. सुंदर रंगसंगती, आकर्षित डिझाइन्समुळे या साड्या सुरेख दिसतात.

 

बालुचेरी साडी

लाल, जांभळा, निळा या रंगछटाच्या रेशमापासून बालुचेरी साडी तयार केली जाते. दोनशे वर्षांचा इतिहास असलेली बालुचेरी साडी मुर्शिदाबाद जिल्ह्यात हातमागावर विणल्या जातात. रामायण, महाभारतासारख्या धार्मिक ग्रंथामधील कथाप्रसंगाची चित्रं पदरावर तर काठावर बारीक बुट्टे, नक्षी, फुलापानांची कलाकुसरी शोभून दिसते.

 

बोमकाई साडी

ओडिशा राज्याची शान असलेली ही साडी. ती बनवण्यासाठी जाडसर (भरड) सूत वापरलं जातं. ज्यामुळे साडीचा पोत जाडसर असतो. सहसा गडद रंगाचा वापर केला जातो. ओडिशाची आणखी एक प्रसिद्ध साडी म्हणजे संबळपुरी. सुती, टसर आणि रेशमी या प्रकारामध्येही साडी उपलब्ध असते हिलाच ‘इक्कत’ म्हणून ही ओळखलं जातं.

पश्चिमेकडची साडी श्रीमंती

पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्राबरोबर गुजरात, राजस्थानही समाविष्ट आहेत. महाराष्ट्राचे राजेशाही वैशिष्ट्य म्हणजेच ‘पैठणी साडी’. ही साडी हातमागावर विणली जाणारी रेशमी साडी आहे. ती पूर्णत: क्लासिक टच क्लासिक लूक देते. फुलं- पानं, नक्षीकाम, मोर आणि अन्य पशुपक्षांची डिझाईन्स यावर आढळतात.

 

 

राजस्थानची बांधणी साडी

‘टाय अ‍ॅण्ड डाय’द्वारे सूती, रेशमी कपड्यांवर विशिष्ट दोर्यानं गाठी मारून डिझाइन्स तयार केले जाते. विविध डिझाइन्स आणि त्यावर भरतकाम, जरदोसी वर्क, रेशमी धाग्यांची कलाकुसरद्वारे या साडीला प्रत्येक वेळी नवीन आकर्षित रूप दिलं जातं.

महाराष्ट्रातील नऊवारी साडी

खणाचे ब्लाऊज जणू पारंपरिकतेचे प्रतिक आहे. ज्यामध्ये योद्धा गृहिणी आणि सौंदर्यवतीचं सौंदर्य लपलेलं आहे. तसेच राजस्थानची घाघरा साडी ही बंधेज आणि जरीबॉर्डरसह असलेली टि.व्ही. सिरीयलमधल्या कलाकारांची खास पसंती आहे.

Web Title: These varities of saree making your wardrobe really rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.