लग्नासाठी लेहेंगा निवडताना 'या' टिप्स फॉलो करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 08:13 PM2018-12-24T20:13:07+5:302018-12-24T20:31:43+5:30
लग्नासाठी लेहेंगा खरेदी करणं हा एक टास्क असतो. कारण कधी तुमच्या आवडीचा रंग मिळत नाही तर कधी डिझाइन मिळत नाही. एखादा लेहेंगा आवडलाच तर तो बजेटच्या बाहेर असतो.
लग्नासाठी लेहेंगा खरेदी करणं हा एक टास्क असतो. कारण कधी तुमच्या आवडीचा रंग मिळत नाही तर कधी डिझाइन मिळत नाही. एखादा लेहेंगा आवडलाच तर तो बजेटच्या बाहेर असतो. तुमचंही लग्न ठरलं असेल आणि त्यासाठी तुम्ही लेहेंगा सिलेक्ट करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.
बजेट डिसाइड करा
तुम्हाला तुमचा लेहेंगा खरेदी करण्याआधी सर्वप्रथम लेहेंग्यासाठी बजेट डिसाइड करणं आवश्यक असतं. काहीही शॉपिंग करण्याच्या विचार करत असाल आणि ती जर बजेटमध्ये झाली तर त्या शॉपिंगची मजा काही औरच असते. जर बजेटच्या बाहेर गेली तर मात्र तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये काटछाट करावी लागते.
तुमच्या लग्नाची पद्धती लक्षात घ्या
लग्नाच्या लेहेंग्याची खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुमच्या लग्नामध्ये कशा पद्धती असतात. जर तुमच्या लग्नामध्ये तुम्हाला डोक्यावरून पदर घेणं आवश्यक असेल तर खूप वर्क असलेला दुपट्टा घेणं टाळा. त्याऐवजी लाइट वर्क असणारा दुपट्टा खरेदी करा.
लग्नाच्या आधी लेहेंगा परिधान करून पाहा
लग्नाच्या दिवशी लेहेंगा परिधान केल्यानंतर कोणताही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून लेहेंगा आधी वेअर करून पाहा. त्यासाठी लेहेंग्याचा ब्लाउज, ज्वेलरी, फिटिंग सर्वकाही आधी चेक करून पाहा.
ज्वेलरीसोबत लेहेंगा मॅच करा
जर तुम्ही लग्नामध्ये गोल्ड डायमंड ज्वेलरी वेअर करणार असाल तर लेहेंगा खरेदी करताना ज्वेलरी मॅच होईल याची काळजी घ्या. मॅचिंग कॉन्ट्रास्ट किंवा कोणताही लूक तुम्हाला ठेवायचा असेल तो लेहेंग्यासोबत मॅच करा.
कलरही लक्षात घ्या
लेहेंगा खरेदी करताना तुमची साइज, स्किन टोन इत्यादी लक्षात घेऊन लेहेंग्याचा कलर निवडा. त्यानंतर कोणत्याही वातावरणात लग्न असलं तरिही लेहेंग्याचा कलर आणि फॅब्रिक निवडा.