​फेसबुकवर फेक अकाउंट वापरणाऱ्यांचे व्हॉटस्अ‍ॅपही होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2016 03:04 PM2016-08-25T15:04:37+5:302016-08-25T20:41:36+5:30

व्हॉटस्अ‍ॅप व फेसबुकने एकत्र मिळून नवी अपटेड आणली आहे, ज्याद्वारे तुमचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि फेसबुक अकाउंट लिंक केले जाणार.

Those who use fake accounts on facebook, will not be able to have WhatsApp | ​फेसबुकवर फेक अकाउंट वापरणाऱ्यांचे व्हॉटस्अ‍ॅपही होणार बंद

​फेसबुकवर फेक अकाउंट वापरणाऱ्यांचे व्हॉटस्अ‍ॅपही होणार बंद

googlenewsNext
सबुकवर खोट्या-बनावटी अकाउंटसच्या माध्यमातून अनेक जण खोडसाळपणा करत असतात. अशी फसवणूक रोखण्यासाठी आता फेसबुकने अधिक कडक पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉटस्अ‍ॅप व फेसबुकने एकत्र मिळून नवी अपटेड आणली आहे, ज्याद्वारे तुमचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि फेसबुक अकाउंट लिंक केले जाणार.

सोप्या शब्दांत सांगायचे तर, एकाच स्मार्टफोन/टॅब्लेटवर जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुक अ‍ॅप इन्स्टॉल केलेले असेल तर कंपनी त्याला इंटरलिंक्ड करणार. दोन्ही ठिकाणी वेगवेगळे मोबाईल क्रमांक जरी वापरले असेल तरी एकच डिव्हाईस असल्यामुळे ते शक्य होणार आहे. त्याद्वारे फेक अकाउंटस्शी निगडित व्हॉटस्अ‍ॅपही बंद केले जाऊ शकते.

ग्राहकांना अधिक सुखकारक आणि सुरक्षित अनुभव देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हे नवीन फीचर विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिली. 

आता हे जरी खरे असले तरी आॅनलाईन जाहिराती अधिकाधिक पर्सनलाईज करण्यासाठी या फीचरचा कंपनीला खूप फायदा होणार आहे. तुम्ही जर आॅनलाईन शॉपिंग करताना मोबाईल क्रमांक दिला असेल तर ती कंपनी जेव्हा फेसबुकवर जाहिरात करेल तेव्हा तुम्हाला ती हमखास दिसणार. अशा तºहेने फेसबुकने एकाच दगडात दोन पक्षी मारले.

Web Title: Those who use fake accounts on facebook, will not be able to have WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.