तीन राजधानी असलेला देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2016 03:37 PM2016-09-09T15:37:30+5:302016-09-09T21:07:30+5:30

दक्षिण आफ्रिका हा जगात असा आगळावेगळा देश आहे की, त्याला तीन राजधानी आहेत.

Three capital city | तीन राजधानी असलेला देश

तीन राजधानी असलेला देश

googlenewsNext

/>तीन राजधानी असलेला देश  ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. परंतु, दक्षिण आफ्रिका  हा जगात  असा आगळावेगळा देश आहे की, त्याला तीन राजधानी आहेत. या तिन्हीही ठिकाणी प्रशासनाचे वेगवेगळे कार्य चालते. प्रिटोरिया, ब्लोमफोंटेन व केपडाऊन असे राजधानी असलेल्या या शहरांची ही  नावे आहेत. या देशाच्या पश्चिमी भागाला फुलांचे राज्य म्हटले जाते. येथे फुलांच्या साडेआठ हजार प्रजाती असल्याचा दावा करण्यात येतो. हे नॅशनल पार्क जगातील सर्वात मोठे संरक्षीत वन आहे. जंगली प्राण्यांचे संरक्षण व्हावे, त्याकरिता हे बनविण्यात आले होते. या पार्कमध्ये जगातील पाच मोठे प्राणी आहेत. यामध्ये हत्ती, गेंडा, वाघ व बिबट्या हे म्हैसीसोबत पाहता येऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेत खाण उद्योग अर्थव्यवस्था ही खूप महत्त्वपूर्ण आहे. येथे सोने, हिरे, प्लेटीनम, लोह व कोळशासह अन्य खाणी आहेत. येथील चलनाचे नाव रॅड असून, आफ्रिकन व इंग्रजी या दोन्ही भाषा अधिक बोलल्या जातात. क्रिकेट हा या देशातील सर्वात आवडता खेळ आहे.

Web Title: Three capital city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.