फॅशनच्या जगातही टायगर प्रिंटसचा रूबाब. पण तो तुम्ही करून बघितला का?

By Admin | Published: May 23, 2017 06:44 PM2017-05-23T18:44:54+5:302017-05-23T18:44:54+5:30

वाघाची कातडी जशी असते अगदी तंतोतंत तशीच प्रिंट असलेले कपडे घालून चारचौघात मिरवणं अगदी कोणत्याही ऋतूत छान, रिच आणि रॉयलच वाटते.

Tiger printers suit the fashion world. But did you see it? | फॅशनच्या जगातही टायगर प्रिंटसचा रूबाब. पण तो तुम्ही करून बघितला का?

फॅशनच्या जगातही टायगर प्रिंटसचा रूबाब. पण तो तुम्ही करून बघितला का?

googlenewsNext

 

- मोहिनी घारपुरे- देशमुख

 वाघाची कातडी अंगावर घेऊन एकेकाळी माणूस आपलं निसर्गापासून संरक्षण करीत असे हे तर सर्वांना माहितच आहे. त्यानंतर काळ लोटला, अनेक वर्ष लोटली. माणूस प्रत्यक्ष स्वत: वस्त्र, कापड तयार करून त्या कापडाचे पोषाख, पेहराव करू लागला. मात्र तरीही वाघाच्या कातडीची आणि प्राण्यांच्या केसांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या कपड्यांची जागा त्याच्या मनात कायमच राहिली. त्यामुळेच गेली कित्येक वर्ष फॅशनच्या जगतात. टायगर प्रिंट्सच्या कपड्यांची क्रेझ  टिकून आहे. टायगर प्रिंट्सचे कपडे घालून मिरवावंस वाटणं हे खरंतर विशेषच. वाघाची कातडी जशी असते अगदी तंतोतंत तशीच प्रिंट असलेले कपडे घालून चारचौघात मिरवणं अगदी कोणत्याही ऋतूत छान, रिच आणि रॉयलच वाटते. सेक्सी दिसण्यासाठीही कित्येकदा या टायगर प्रिंट्सच्या कपड्याला पसंती दिली जाते. त्याचबरोबर फरचे कपडे, फरची किनार असलेले जॅकेट्स, ड्रेसेस, श्रग्स, आदी तऱ्हेतऱ्हेच्या कपड्यांना परदेशातील स्त्रीयांच्या वॉर्डरोबमध्ये स्थान मिळतंच .

 

                  

Web Title: Tiger printers suit the fashion world. But did you see it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.