​तिळगूळ घ्या गोड गोड बोला..., आप्तेष्टांना द्या गोड शुभेच्छा !!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2017 05:11 PM2017-01-13T17:11:36+5:302017-01-13T17:11:36+5:30

जुने झाले गेले विसरुन पुन्हा नव्याने मैत्री-नाते जोडण्याचा मकरसंक्रांत हा गोड सण आहे. यादिवशी एकमेकांना तिळगूळ देऊन गोड शुभेच्छा दिल्या जातात.

Tilgul take sweet sweet ..., give nice to sweet wishes !!! | ​तिळगूळ घ्या गोड गोड बोला..., आप्तेष्टांना द्या गोड शुभेच्छा !!!

​तिळगूळ घ्या गोड गोड बोला..., आप्तेष्टांना द्या गोड शुभेच्छा !!!

Next
ong>-रवीन्द्र मोरे 

जुने झाले गेले विसरुन पुन्हा नव्याने मैत्री-नाते जोडण्याचा मकरसंक्रांत हा गोड सण आहे. यादिवशी एकमेकांना तिळगूळ देऊन गोड शुभेच्छा दिल्या जातात. मात्र जर तुम्ही तुमच्या कुटुंबियांपासून दूर असाल, तुमचे मित्र परगावी असतील तर त्यांना व्हॉट्सअ‍ॅप किंवा एसएमएसने शुभेच्छा देण्यास विसरू नका.

* तुमच्या यशाचा पतंग उंचच उंच उडत राहो हीच सदिच्छा

* गुळाची गोडी.. त्याला तिळाची जोडी.. नात्यांचा गंध त्याला स्नेहाचा सुंगध मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

* मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!

* उडवू पतंग जमवून सवंगडी, आवडीने चाखू तिळगुळाची गोडी

* आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम,
गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा!
तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला!

* एक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला.
खुद्कन हसला, हातावर येताच बोलू लागला..तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

* मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान 
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

* तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडू
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

* तीळ आणि गुळासारखी रहावी, आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

* नात्यातील कटुता इथेच संपवाङ्घ.तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

* झाले, गेले विसरुन जाऊ तिळगुळ खात गोड गोड बोलू..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

* मनात असते आपुलकी, म्हणुन स्वर होतो ओला.. हलवा, तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला!
* मांजा, चक्री, पतंगाची काटाकाटी, हलवा, तिळगुळ, गुळपोळी, संक्रांतीची लज्ज्त न्यारी, पतंगाप्रमाणे घ्या आकाशी भरारी
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!

* अखंड राहो तुमची जोडी
हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!

* नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे, तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!

* तिळाचे आणि गुळाचे होता मनोमिलन, बनला गोड लाडू, 
देऊन एकमेका तीळगुळ नाती नवी जोडू
 

Web Title: Tilgul take sweet sweet ..., give nice to sweet wishes !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.