​‘टिंडर’ने केली वयोमर्यादा 18 वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2016 10:37 AM2016-06-10T10:37:19+5:302016-06-10T16:07:19+5:30

‘टिंडर’ने धोरणांमध्ये मोठा बदल करत आता यूजरची वयोमर्यादा 18 वर्ष केली आहे.

Tinder's age is 18 years | ​‘टिंडर’ने केली वयोमर्यादा 18 वर्ष

​‘टिंडर’ने केली वयोमर्यादा 18 वर्ष

Next
नलाईन डेटिंग अ‍ॅप ‘टिंडर’ने धोरणांमध्ये मोठा बदल करत आता यूजरची वयोमर्यादा 18 वर्ष केली आहे. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यापासून 18 पेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींना टिंडर जॉईन करता येणार नाही.

आतापर्यंत ही 13 वयोवर्षापर्यंतचे लोक ‘टिंडर’द्वारे आपले प्रेम शोधू शकत. 13 ते 17 वयोगटातील यूजर्सची केवळ याच वयाच्या लोकांशी जोडी लावण्यात येत असे. 

2012 मध्ये ‘टिंडर’ अ‍ॅप लाँच झाल्यापासून आॅनलाईन डेटिंगचे प्रस्थ वाढले आहे. आपल्या निवडीनिवडी आणि जागेनुसार टिंडर तुमच्यासमोर ‘पोटेंशिअल डेट’चे प्रस्ताव मांडते. प्रोफाईल माहिती वाचून तुम्ही समोरिल व्यक्तीला भेटण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता.

कंपनीच्या कम्युनिकेशन विभागाचे उपाध्यक्ष रोसेट पॅम्बाकिएन यांनी घोषणा करताना सांगितले की, आमच्या अ‍ॅपवर आतापर्यंत सुमारे 1100 कोटी कनेक्शन्स तयार झाले आहेत. एक विश्वासू आणि उपयुक्त अ‍ॅप या नात्याने यूजर्सना सदैव चांगली सुविधा देण्याचा आमचा हेतू आहे. त्यानुसार, 18 पेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी टिंडर उपलब्ध न करण्याचा आम्ही निर्णय घेतला.

कंपनीचे सीईओ शॉन रॅड म्हणाले की, बऱ्याच काळापासून यूजर्स अधिक भिन्न आणि उत्तम अनुभव देणाचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यादृष्टीने सज्ञान नसलेल्या यूजर्सच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता वयोमर्यादा 18 करण्यात येत आहे.

Web Title: Tinder's age is 18 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.