ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करण्याचा विचार करताय?; मग 'या' गोष्टी लक्षात घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 17:28 IST2019-11-04T17:27:30+5:302019-11-04T17:28:15+5:30
सध्या फॅशन वर्ल्डमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड जोमात आहे. एवढचं नाहीतर या ज्वेलरीला प्रचंड मागणी आहे. या ज्वेलरीची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही कोणत्याही आउटफिट्ससोबत ही ज्वेलरी कॅरी करू शकता.

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करण्याचा विचार करताय?; मग 'या' गोष्टी लक्षात घ्या
सध्या फॅशन वर्ल्डमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड जोमात आहे. एवढचं नाहीतर या ज्वेलरीला प्रचंड मागणी आहे. या ज्वेलरीची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही कोणत्याही आउटफिट्ससोबत ही ज्वेलरी कॅरी करू शकता. यामुळे फक्त मॉर्डन लूक मिळत नाही तर तुमचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी मदत करते. पण तुम्हाला माहीत आहे का? या दागिन्यांची फार काळजी घेण्याची गरज असते. नाहीतर हे दागिने काळे दिसू लागतात.
तसं पाहायला गेलं तर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीला थोडाफार काळपटपणा दिसून येतो. हा काळपटपणा सल्फरसोबत एकत्र येऊन सिल्वर सल्फाइड तयार झाल्यामुळे येतो. परंतु, काही गोष्टी लक्षात घेतल्या तर ज्वेलरीचा लकू क्लासी राहण्यास मदत होते.
जाणून घेऊया ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची काळजी घेण्यासाठी काही टिप्स :
- तुमच्याकडे असलेले कोणतेही ऑक्साइडचे दागिने कापसामध्ये कव्हर करून ठेवा.
- जेव्हाही तुम्ही ज्वेलरी खरेदी कराल तेव्हा त्याची क्वालिटी चेक करायला विसरू नका. दागिने तयार करण्यासाठी कोणतं मेटल वापरलं आहे, हे तपासून पाहा. मेटल खराब क्वॉलिटिचं असेल तर त्यामुळे स्किन अॅलर्जी होऊ शकते. तसेच ज्वेलरी खरेदी करताना वॉरंटी आणि गॅरंटी तपासून पाहा.
- जे दागिने तुम्ही खरेदी करणार असाल ते जास्त हेव्ही नसावे. खासकरून ईअररिंग्स. त्यामुळे तुमच्या कानांना त्रास होऊ शकतो. तसंही सध्या हेव्ही दागिन्यांऐवजी हलके दागिने वेअर करण्याचा ट्रेन्ड आहे.
- जर तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी ऑनलाइन खरेदी करत असाल तर ब्रँड विश्वसनिय आहे याची खात्री करून घ्या.
- नॉर्मल कंज्युमर वेबसाइट्समधून ज्वेलरी खरेदी करण्यासाठी अनेक ऑप्शन्स मिळतील. तुम्ही तुमचं बजेट आणि आवडीनुसार योग्य तो पर्याय निवडू शकता.