सतत हिल्स वापरल्यामुळे पाय दुखू लागलेयत? या टिप्स वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 05:07 PM2018-08-27T17:07:35+5:302018-08-27T17:10:32+5:30

सध्याच्या मुलींचा लूक हाय हिल्सशिवाय पूर्ण होत नाही. पण हाय हिल्स घातल्याने अनेकदा पायांच्या दुखण्याला सामोरं जावं लागतं.

tips to have pain free experience while wearing high heels | सतत हिल्स वापरल्यामुळे पाय दुखू लागलेयत? या टिप्स वापरा!

सतत हिल्स वापरल्यामुळे पाय दुखू लागलेयत? या टिप्स वापरा!

Next

सध्याच्या मुलींचा लूक हाय हिल्सशिवाय पूर्ण होत नाही. पण हाय हिल्स घातल्याने अनेकदा पायांच्या दुखण्याला सामोरं जावं लागतं. तसेच खूप वेळ हाय हिल्स घातल्याने किंवा खूपवेळ हाय हिल्स घालून चालल्याने शू-बाइटचा त्रास होतो. हिल्स घालायला आवडत असतील पण त्यामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका करून घ्यायची असेल तर काही टिप्सचा वापर तुम्ही करू शकता. 

योग्य साइजच्या हिल्स वापरा

हिल्समुळे आपले पाय पुढच्या बाजूला झुकतात. अशातच अनेकवेळा योग्य साइज निवडणं अशक्य होतं. त्यामुळे हिल्स घेण्याआधी पायांचं माप घ्या आणि त्यानंतरच फुटवेअर ट्राय करा. 

फुटवेअर घेताना आपल्या पायांचा प्रकार ओळखा

सर्वांचे पायांचे प्रकार वेगवेगळे आढळून येतात. काहींचे पाय फ्लॅट असतात. तर काहींचे कर्व्ड असतात. अशातच सर्वात आधी आपल्या पायाचा प्रकार ओळखून हिल्स खरेदी करणं फायदेशीर ठरतं. 

मोठ्या हिल्स घालणं फयदेशीर

हिल्सचं नाव काढलं की, सर्वात आधी पेन्सिल हिल्स किंवा स्टिलेटोचा विचार करण्यात येतो. परंतु, कम्फर्टचा विचार कराल तर मोठ्या हिल्स जास्त कंर्म्फटेबल असतात. कारण या हिल्स घातल्याने पायांना जास्त सपोर्ट मिळतो. यामुळे पायांवर प्रेशर पर कमी येतं. 

ब्रेक घ्या

हिल्स घातल्यामुळे फॅशनेबल लूक्स मिळण्यास मदत होते. परंतु, पायांच्या दुखण्यामुळे हिल्स घालण्यापासून ब्रेक घेणं गरजेचं असतं. हिल्स घालून सतत चालणं किंवा उभं राहणं दुखण्याचं कारण ठरू शकतं. त्यामुळे थोडा वेळ त्या पायातून काढा आणि पायांना आराम द्या. 

Web Title: tips to have pain free experience while wearing high heels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन