तुमच्या फिगरनुसार कोणता स्कर्ट तुम्हाला परफेक्ट सूट होईल?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 06:22 PM2018-08-29T18:22:06+5:302018-08-29T18:34:40+5:30
शॉपिंगसाठी बाजारात गेल्यानंतर अनेक प्रकारचे आणि वेगवेगळ्या स्टाईल्सचे कपडे बाजारात पाहायला मिळतात. सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्कर्ट्सचा ट्रेन्ड आहे.
शॉपिंगसाठी बाजारात गेल्यानंतर अनेक प्रकारचे आणि वेगवेगळ्या स्टाईल्सचे कपडे बाजारात पाहायला मिळतात. सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्कर्ट्सचा ट्रेन्ड आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आणि पॅटर्नच्या स्कर्ट्समुळे तुम्हाला स्टायलिश लूक कॅरी करण्यासाठी मदत होईल. परंतु, फिगरनुसार योग्य त्या शेपचा स्कर्ट खरेदी करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्हाला फिगरनुसार योग्य स्कर्ट खरेदी करण्यासाठी मदत करतील...
आवरग्लास फिगर
आवरग्लास बॉडी शेप असणाऱ्या मुलींना पेन्सिल स्कर्ट परफेक्ट लूक देतो. हा स्कर्ट घातल्याने तुम्हाला परफेक्ट लूक मिळण्यास मदत होते.
स्लिम फिगर
स्लिम फिगर असणाऱ्या मुलींनी A-Line स्कर्ट वापरावा. कारण यामुळे त्यांचा सडपातळपणा लपून जातो. हा स्कर्ट घातल्याने सडपातळ मुलींना परफेक्ट लूक मिळतो.
पियर शेप फिगर
पियर शेप फिगर असणाऱ्या मुली आपल्या शरीराचा घेर आणि लठ्ठपणामुळे स्कर्ट घालणं टाळतात. परंतु लॉन्ग A-Line स्कर्ट घातल्याने त्यांना परफेक्ट लूक मिळतो.
अॅपल फिगर
जर तुमची अॅपल फिगर असेल तर तुम्ही हाय वेस्ट स्कर्ट घालू शकता. यामुळे तुम्हाला स्टायलिश लूकसोबतच स्लिम फिगर दिसण्यास मदत होईल.
वाइड हिप्स
वाइड हिप्स असणाऱ्या मुलींनी शक्यतो ट्रम्पेट स्कर्टची निवड करावी. यामुळे फिगरला अपीलिंग लूक मिळण्यास मदत होईल.