हॅन्डबॅगची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स अवश्य वापरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 01:38 PM2018-09-16T13:38:29+5:302018-09-16T13:39:51+5:30
सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग वापरण्यात येतात. कधी आपल्या पेहरावानुसार मॅचिंग हॅन्डबॅग निवडली जाते तर कधी हटके स्टाइल बॅग निवडली जाते. अनेक महिलांच्या बॅग्सच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक बॅग्ज दिसून येतात.
सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग वापरण्यात येतात. कधी आपल्या पेहरावानुसार मॅचिंग हॅन्डबॅग निवडली जाते तर कधी हटके स्टाइल बॅग निवडली जाते. अनेक महिलांच्या बॅग्सच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक बॅग्ज दिसून येतात. बऱ्याचदा इतर बॅग्जपेक्षा लेदरच्या बॅग्जना पसंती देण्यात येते. पण अनेकदा या बॅग्जची काळजी घेण्यामध्ये कुठेतरी चूक होते. त्यामुळे त्या फार काळ टिकत नाहीत. जर या बॅग्जची योग्य ती काळजी घेतली तर बॅग जास्त काळ टिकण्यास मदत होते.
हॅन्डबॅग पॉलिश करा
जसं बुटांना काही वेळाने पॉलिश करण्याची गरज भासते त्याचप्रामणे लेदरपासून तयार करण्यात आलेल्या हॅन्डबॅग्जनाही काही काळाने देखभाल करण्याती गरज भासते. बाजारामध्ये लेदर बॅग्जची काळजी घेण्यासाठी काही उत्पादन उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या हॅन्डबॅगची काळजी घेऊ शकता.
तुम्ही तुमची हॅन्डबॅग एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवता का?
हॅन्डबॅग जास्तीजास्त टिकावी म्हणून ती एखाद्या कोपऱ्यामध्ये न ठेवता. तुमच्या वॉर्डरोबमध्ये किंवा कपाटामध्ये सरळ उभी करून ठेवा. हॅन्डबॅग विकत घेताना तुम्हाला त्याच्यासोबत एक कव्हर मिळेल. त्याच कव्हरमध्ये ती ठेवणं फायदेशीर ठरेल.
जर तुमच्या हॅन्डबॅगवर एखाद्या गोष्टीचा डाग लागला असेल तर ते लगेचचं स्वच्छ करा. त्यामुळे हॅन्डबॅगचा लूक तसाच टिकून राहण्यास मदत होईल.
हॅन्डबॅगमध्ये कोणतीही वस्तू ठेवताना अथवा कॉस्मॅटिक्स ठेवताना त्या व्यवस्थित ठेवा. कारण त्यामुळे हॅन्डबॅगच्या आतल्या कापडाला डाग लागण्याची शक्यता असते.