तीन फुट पाण्यात बुडाले टायटॅनिक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2016 09:16 PM2016-03-27T21:16:41+5:302016-03-27T21:12:54+5:30
आरएमएस टायटॅनिक जहाज पुन्हा बनवण्यात येत आहे. १९१२ मध्ये याच नावाचे जहाज अटलांटिक महासागरात बुडाले होते.
Next
आ एमएस टायटॅनिक जहाज पुन्हा बनवण्यात येत आहे. १९१२ मध्ये याच नावाचे जहाज अटलांटिक महासागरात बुडाले होते. त्यामध्ये पंधराशेपेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले होते. या घटनेवर आधारित अनेक सिनेमे आणि डॉक्युमेंट्री बनवण्यात आल्या. परंतु दिग्दर्शक जेम्स कॅमरूनचा टायटॅनिक सिनेमा सर्वाधिक चर्चेत राहिला. केट विंसलेट आणि लिओनार्डो डिकॅप्रियो स्टार असलेला हा सिनेमा १ नोव्हेंबर १९९७ ला रिलीज झाला होता. सिनेमाने कमाईबरोबरच पुरस्कारांची रांग लावली होती. सत्य घटनेवर आधारित सिनेमाचे एकूण बजेट त्याकाळी जवळपास १२५० कोटी रु पये होते. यातून झालेली कमाई जवळपास १४ हजार कोटी होती. चित्रपटातील दृश्य थक्क करणारे होते. अथांग महासागारातील दृश्य अनेकांचे भुवया उंचावणारे होते. मात्र प्रत्यक्षात हा अथांग महासागर नसून तीन फुट पाण्याचा तलाव होता. जहाज बुडवितानाच क्षण चित्रित करण्यासाठी तीन फुट पाण्याचे तलाव करण्यात आले होते. त्यामध्येच टायटॅनिक जहाजाला समाधी देण्यात आली होती.