​कोणते खेळाडू ठरले ‘टिंडर’वर टॉप?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2016 09:32 AM2016-08-24T09:32:58+5:302016-08-24T15:02:58+5:30

खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांचे लक्ष होते ते आॅनलाईन डेटिंग अ‍ॅप ‘टिंडर’वर कोण बाजी मारणार.

Top player on 'Tinder'? | ​कोणते खेळाडू ठरले ‘टिंडर’वर टॉप?

​कोणते खेळाडू ठरले ‘टिंडर’वर टॉप?

Next
िवारी पार पडलेल्या शानदार सोहळ्यासह यंदाची रिओ आॅलिम्पिक स्पर्धा संपन्न झाली. नेहमीप्रमाणे पदकांच्या यादीत अमेरिका अव्वल तर भारताची कामगिरी दोन खेळाडू सोडले तर निराशाजनक ठरली. परंतु विक्रम आणि गोल्ड मेडलच्या तालिकेत आपले नाव नोंदविण्याबरोबरच खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांचे लक्ष होते ते आॅनलाईन डेटिंग अ‍ॅप ‘टिंडर’वर कोण बाजी मारणार.

कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार कोण्या एका खेळाडूचे नाव जरी घोषित केले नसले तरी कोणत्या खेळाच्या प्लेयरला टिंडरवर ‘डिमांड’ होती याची यादीच त्यांनी शेअर केली. त्यानुसार पुरुषांमध्ये टेनिस प्लेयर्स तर महिलांमध्ये टेबल-टेनिस खेळाडू टिंडरवर हीट ठरले.

आॅलिम्पिक स्पर्धे दरम्यान खेळाडूंनी आपल्या प्रोफाईलमध्ये स्वत:चे वर्णन काय केले (उदा. प्रोफेशनल स्वीमर, इंग्लंड संघातील वेटलिफ्टर किंवा जगातील सर्वात वेगवान धावपटू) यावरून टिंडरने ही यादी जाहीर केली आहे. त्यानुसार पुढील खेळांतील खेळाडंूना सर्वाधिक राईट-स्वीप्स म्हणजेच डिमांड होती- 

    पुरुष खेळाडू            महिला खेळाडू

१.    टेनिस                 टेबल टेनिस
२.    वेटलिफ्टिंग         फिल्ड हॉकी
३.    जिम्नॅस्टिक        रोविंग
४.    स्पोर्ट शूटींग         वेटलिफ्टिंग
५.    जुदो                    रुग्बी

यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की, कोणत्या खेळाडूने आॅलिम्पिक ग्राममध्ये सर्वाधिक ‘डेटिंग’ केली असेल. आता ज्यांना २०२० साली होणाºया टोकियो आॅलिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील यादीवरून खेळाची निवड करावी, म्हणजे नाही पदक तर किमान टिंडरवर तर काही चान्स राहील, नाही का!

Web Title: Top player on 'Tinder'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.