ट्रेंड हेअर बँडचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 02:33 AM2017-08-17T02:33:40+5:302017-08-17T02:33:42+5:30

वेशभूषेबरोबर तुमची हेअर स्टाईल कोणत्याही समारंभात तितकीच महत्त्वाची असते.

Trend Hairband | ट्रेंड हेअर बँडचा

ट्रेंड हेअर बँडचा

Next

- रीना चव्हाण
वेशभूषेबरोबर तुमची हेअर स्टाईल कोणत्याही समारंभात तितकीच महत्त्वाची असते. विविध एक्सेसरीजबरोबर हेअर बँडहासुद्धा हेअर स्टाईलसाठी चांगला आॅप्शन आहे. साधारणत: ७० ते ८० च्या दशकापासून हेअर बँड प्रचलित आहे. त्या वेळी चित्रपटामध्ये अभिनेत्रीसुद्धा यांचा वापर करीत. या वर्षांमध्ये हेअर बँड कधी जास्त प्रचलित झाले तर कधी फॅशनच्या बाहेर गेला. पण पुन्हा एकदा या हेअर बँडचा ट्रेंड आल्याने, वेगवेगळ्या आकारात आणि डिझाइनमध्ये मार्केटमध्ये ते सहजच उपलब्ध आहेत. आतासुद्धा काही चित्रपटांमध्ये ड्रेसला सूट होईल असा हेअर बँड अभिनेत्री लावताना दिसतात. जर तुम्हालासुद्धा वेगवेगळे हेअर बँड आवडत असतील तर तुम्ही ट्राय करु शकता.
हेअर बॅड हा ड्रेस आणि काही वेळा जिन्सवरही घातला जातो. यामुळे महिलांनपासून लहान मुलींपर्यत साºयांना या हेअर बॅडचे आकर्षण आहे. ड्रेसला मॅच होणारे हेअर बॅड लावले तर तुमचे सौदर्य निश्चितच खुलून दिसेल.
>सिंपल हेअर बँड
कोणतीही कलाकुसर न केलेले हे हेअर बँड प्लास्टीक नाहीतर मेटलमध्ये सहज मार्केटमध्ये मिळतात. कॅज्युअल लूक येण्यासाठी हेअर बँड चांगला पर्याय आहे. केस मोकळे ठेवून नुसता हेअर बँड लावला तरी छान दिसतो. नाहीतर हेअर बँड लावून पोनी घातली तरी एक आकर्षक लूक येतो. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ते उठून दिसतात. वेगवेगळ्या कलरमध्ये मिळणारे हे हेअर बँड तुम्हाला पाहिजे त्या ड्रेसवर घालता येतात.
>बटरफ्लाय हेअर बँड
लहान मुली आणि शाळेत जाणाºया मुलींमध्ये बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरं असलेल्या हेअर बँडला जास्त पसंती दिसते. तसेच एखाद्या समारंभात वेस्टर्न ड्रेसवर त्याला साजेसा हेअर बँड घातल्यास छान वाटतो.
>ज्वेल्ड हेअर बँड
संध्याकाळच्या पार्टीसाठी कुठे बाहेर जायचे असले तर त्या ड्रेसवर हे बँड एक ग्लॅमरस लूक देतात. हेअर बँडमुळे हेअर स्टाईल केलेली असो वा नसो तुम्ही इतरामध्ये उठून दिसता. इव्हिनिंग गाऊन आणि कॉकटेल ड्रेसवर छान दिसतात.
>बीड्स (मोती) हेअर बँड
बीड्स लावलेले हेअर बँडला लहान मुलींबरोबर कॉलेज तरुणींकडून पसंती दर्शविली जाते. यामध्ये छोटे- मोठे बीड्स असून वेगवेगळ्या कलरचे बीड्सचे हेअर बँड आवडत असतील तर तेसुद्धा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. जीन्स, स्कर्टवर ते शोभून दिसतात.
>स्टोन हेअर बँड
स्टोन, मोती लावलेले हेअर ब्रँड लहान मुलींबरोबर कॉलेज युवतीमध्ये लोकप्रिय आहेत. या बँडमध्ये वेगवेगळ्या रंगाचे स्टोन लावलेले असतात. कोणत्याही ड्रेसवर ते उठून दिसतात. त्यामुळे खास कार्यक्रमासाठी तुम्ही परिधान करु शकता.
>फ्लॉवर हेअर बँड
लग्न वा अन्य काही समारंभात फुलांची कलाकुसर असलेले हे हेअर बँड छान दिसतात. पारंपरिक पेहराबरोबर तर ते आणखीन उठून दिसतात. हे बँड मेटल, सिल्क, फेब्रिक बरोबर स्टोनची कलाकुसर केलेले असतात. पण एक लक्षात ठेवा हेअर बँडवरील फुलांची डिझाइन तुमचा पोषाखाला मॅच करणारी असावी.
>क्लोथ हेअर बँड
कपड्यापासून बनविलेले हेअर बँडसुद्धा खूप आकर्षक दिसतात. वेस्टर्न ड्रेसबरोबर ते उठून दिसतात. वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यातील बँडबरोबर प्रिंटेंड बँडसुद्धा छान वाटतात.

Web Title: Trend Hairband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.