Trend : ​घरीच बनवा ‘मुव्ही प्रोजेक्टर’ फक्त १०० रुपयात !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2017 11:32 AM2017-01-27T11:32:51+5:302017-01-27T17:19:35+5:30

प्रत्येकजण महागडा प्रोजेक्टर विकत घेऊ शकत नाही. जर आपणास प्रोजेक्टरवर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने...

Trend: Make the movie 'Movie Projector' at just Rs 100! | Trend : ​घरीच बनवा ‘मुव्ही प्रोजेक्टर’ फक्त १०० रुपयात !

Trend : ​घरीच बनवा ‘मुव्ही प्रोजेक्टर’ फक्त १०० रुपयात !

googlenewsNext
ong>-Ravindra More
थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद काही औरच असतो, मात्र प्रत्येकवेळी थिएटरमध्ये जाणे शक्य नसते. काहीजण प्रोजेक्टरच्या साह्यानेही घरी चित्रपट पाहण्याचा आनंद घेतात, मात्र प्रत्येकजण महागडा प्रोजेक्टर विकत घेऊ शकत नाही. जर आपणास प्रोजेक्टरवर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बुटांचे खोके आणि मॅग्नीफाइंग लेन्सच्या साह्याने मुव्ही प्रोजेक्टर बनवू शकता. विशेष म्हणजे हा प्रोजेक्टर आपल्या स्मार्टफोनवर काम करेल आणि खर्च येईल फक्त १०० रुपये. शिवाय  तयार होईल तोही १५ मिनिटात.

कोणते साहित्य लागेल
* एक मोकळे बुटांचे खोके (शू बॉक्स)
* मॅग्नीफाइंग लेन्स
* पेपर कटर
* चिपकविण्यासाठी डिंक व टेप
* थर्माकोलचा तुकडा
* स्मार्टफोन (चित्रपटासाठी)
नोट : मोबाइल मुव्ही प्रोजेक्टर बनविण्यासाठीचे साहित्य घरातच मिळेल. फक्त मॅग्नीफाइंग लेन्स मार्केटमधून खरेदी करावे लागेल. त्याची किंमत ५० रुपयापासून सुरू होते. एक चांगली मॅग्नीफाइंग लेन्स १०० रुपयात मिळू शकते. तशी लेन्स जेवढी मोठी आणि पॉवरफुल तेवढा प्रोजेक्टर चांगला काम करेल.

मुव्ही प्रोजेक्टर बनविण्याची संपूर्ण प्रोसेस
* मुव्ही प्रोजेक्टर बनविण्यासाठी सर्वप्रथम लेन्सचे हॅँडल पेपर कटर किंवा चाकूने कापून टाका.
* लेन्सचे हॅँडल वेगळे झाल्यानंतर लेन्सला शू बॉक्सवर ठेऊन चारही बाजूने मार्क करा.
* आता लेन्सला फिट करण्यासाठी बॉक्सवर मार्क केलेला गोल भाग कापा. 
* यानंतर बॉक्सच्या वरील कव्हरवरही लेन्स ठेऊन मार्क करा व तेवढा भाग कापा. 
* याप्रकारे बॉक्समध्ये लेन्सच्या आकाराचे होल निर्माण होतील.
* बॉक्समध्ये लेन्स तयार झाल्यानंतर लेन्सला त्यात फिट करा आणि डिंकाच्या मदतीने चिपकवून घ्या. 
* डिंक वाळल्यानंतर बॉक्सच्या मध्ये स्मार्टफोन ठेवण्यासाठीचा स्टॅँड बनवावा. यासाठी थर्माकोलच्या तुकड्यांचा वापर करावा. 
* स्टॅँड बनविण्यासाठी सर्वप्रथम बॉक्सच्या मधल्या भागाचे मोजमाप करुन थर्माकोलचे दोन लांब तुकडे कापा. या दोन्ही तुकड्यांना अशाप्रकारे कापा की ते बॉक्समध्ये सहज हलविता येतील.  
* यानंतर एका तुकड्याला दुसºया तुकड्यावर ९० अंशाने चिपकवा. याप्रकारे एक स्टॅँड बनेल. आता या स्टॅँडवर टेपच्या साह्याने स्मार्टफोनला फिट करा, मात्र स्क्रीनवर टेप होता कामा नये. 
* फोनची स्क्रीन लेन्सच्या बाजूने ठेवा. 
* आता स्मार्टफोनवर कोणत्याही चित्रपटाचा व्हिडीओ सुरू करा. जेव्हा आपण एखादा चित्रपट प्ले करता तेव्हा फोनचा डिस्प्ले रिजोल्यूशन १०० पर्यंत वाढवा. यामुळे चांगला व्हिडिओ आऊटपुट मिळेल. 
* चित्रपट अधिक चांगला दिसण्यासाठी व्हिडिओचा आऊटपुट एखाद्या पांढºया भिंतीवर घ्या. आपला स्मार्टफोन बॉक्समध्ये असल्याने साऊंडची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी आपण ब्लूटूथ स्पीकरचा वापर करू शकता. 
अशा पद्धतीने अतिशय कमी खर्चात आणि कमी वेळेत घरच्या घरी मुव्ही प्रोजेक्ट तयार होईल.

Web Title: Trend: Make the movie 'Movie Projector' at just Rs 100!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.