ट्विटरने वाढवली ‘जीआयएफ’ची साईज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2016 01:53 PM2016-07-12T13:53:48+5:302016-07-12T19:23:48+5:30

आता ५ एमबी जीआयएफऐवजी १५ एमबीपर्यंतची जीआयएफ तुम्ही ट्विट करू शकणार.

Twitter 'GIF' size increased | ट्विटरने वाढवली ‘जीआयएफ’ची साईज

ट्विटरने वाढवली ‘जीआयएफ’ची साईज

Next
यक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने आता यूजर्सना खूश करण्यासाठी ट्विटमध्ये अ‍ॅनिमेटेड जीआयएफ (ग्राफिकल इंटरचेंज फॉरमॅट) अपलोड करण्याची साईज लिमिट तिपटीने वाढवली आहे. त्यामुळे आता ५ एमबी जीआयएफऐवजी १५ एमबीपर्यंतची जीआयएफ तुम्ही ट्विट करू शकणार.

पण ही सुविधा केवळ डेस्कटॉपवरून वेबद्वारे उपलोड करण्यासाठी असणार आहे. मोबाईलवर मात्र पाच एमबीची अट कायम राहणार. म्हणजे वेब यूजर्ससाठी अधिक मोठ्या साईजच्या आणि अधिक आकर्षक व क्रिएटिव्ह जीआयएफ अपलोड करण्याची संधी या नव्या अपडेटमुळे उपलब्ध होणार आहे.

अद्याप ही सुविधा ‘ट्विटडेक’साठी लागू झालेली नाही. ट्विटरमध्ये येणारे अपडेटस् ‘ट्विटडेक’करिता नेहमीच सर्वात शेवटी उपलब्ध करून देण्यात येतात. नवे युजर्स जोडण्याचे मोठे आव्हान ट्विटर समोर आहे.

ट्विटमधील शब्दमर्यादा वाढविण्याबरोबरच इतर अनेक बदल कंपनीने घोषित केलेले आहेत. जीआयएफ साईज लिमिट वाढविणे हादेखील याच नव्या धोरणाचा एक भाग आहे.

Tweeter GIF

Web Title: Twitter 'GIF' size increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.