छत्री का पर्सनल होना तो बनता है!
By admin | Published: June 24, 2017 02:47 PM2017-06-24T14:47:39+5:302017-06-24T14:49:01+5:30
छत्री पावसाळ्यात तर सगळेच वापरतात, पण त्या छत्रीला ‘आपलंसं’ कसं करायचं?
पवित्रा कस्तुरे
छत्री पावसाळ्यात घ्यावीच लागते. आपण घेतोही. म्हणजे काय करतो दुकानात जातो. आवडेल ती छत्री उचलतो. पैसे देतो. वापरतो. काहीजण अनेक वर्षे छत्र्या दुरुस्त करुन वापरत राहतात. मात्र त्या छत्रीवर आपलं काही प्रेमबिम असतं का? की पावसाला काळे झेंडे दाखवायचे पूर्वी छत्र्यांचे आता रंगीत झेंडे आले इतकंच. मात्र छत्री ही आपलं पावसाळ्यातलं एक स्टाईल स्टेटमेण्ट होवू शकते हे आपल्या लक्षातही येत नाही. पण ज्यांच्या येतं, त्यांच्या छत्र्या पहा. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक रंग त्या छत्रीत दिसतात. आणि आपण छत्री पाहून सांगू शकतो वापरणाऱ्याच्या दिल का हाल! आपली छत्री पाहून आपल्याला कुणी बावळं म्हणू नये आणि दुसरं म्हणजे पावसाळा मस्त एन्जॉय करता यावा म्हणून जरा मस्त पर्सनलाईज्ड टच देवू आपल्या छत्रीला!
१) हल्ली छत्री रंगवण्याचे बरेच वर्कशॉप घेतले जातात. त्याला जाता येईल. आपण आपली छत्री रंगवू.
२) ते नको असेल तर आपल्या छत्रीवर आपणच एखादं छोटं चित्र काढू.
३) छत्रीला काही स्टिकर लावता येतात, त्यानं आपली छत्री गर्दीत ओळखूही येते, दिसतेही वेगळी.
४) लटकन मिळतात ना बाजारात, तसे लटकन छत्रीला लावता येतात.
५) आपल्या ड्रेसला मॅचिंग छत्र्या काहीजणी वापरतात. पण ते करणं शक्य नसतंच सगळ्यांना म्हणून मग ब्राईट कलरची छत्री वापरावी. ती दिसते मस्त.
६) आपला मूड कसाही असो, छत्री छान असेल तर ती आपल्याविषयी इतरांना बरंच काही सांगते, आपल्याही नकळत.