अंडर टू स्पाईक हेअर स्टाईलचे तरुणाईत फॅड !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2016 02:40 PM2016-07-01T14:40:41+5:302016-07-01T20:10:41+5:30

आपले व्यक्तीमत्त्व हे आकर्षक व उठवून दिसण्यासाठी हेअर स्टाईल ही खूप आवश्यक आहे

Under the age of Spike hairstyles! | अंडर टू स्पाईक हेअर स्टाईलचे तरुणाईत फॅड !

अंडर टू स्पाईक हेअर स्टाईलचे तरुणाईत फॅड !

Next

/>
. कुठलाही ड्रेस परिधान केला असेल  किंवा कितीही मेकअप केला  असेल. पण हेअर स्टाईल व्यवस्थीत नसेल तर आपला लूक हा व्यवस्थीत वाटत नाही. त्यामुळेच विविध प्रकारच्या हेअर स्टाईल केल्या जातात. सध्या तरुणाईमध्ये अंडर टू स्पाईक या हेअरस्टाईलचे फॅड लागल्याचे दिसून येते. अलीकडे बॉलीवूडच्या  अनेक चित्रपटात बडे स्टारही या स्टाईलमध्येच वावरताना दिसतात. त्यामुळे तरुणाईमध्ये दिवसेंदिवस ती जास्तच फेमस होत आहे.

कशी असते अंडर टू स्पाईक हेअर स्टाईल
 या हेअरस्टाईलमध्ये कानाजवळील केसाच्या दोन्हीही बाजूने अतिशय बारीक केस असतात. त्या बारीक केस असलेल्या  जागेवर आपल्याला आवडणारे एखादे नाव, टॅटू अशी  कोणतीही डिझाईन करता येते. ही हेअर स्टाईल साधारणत : एक ते दीड महिन्यापर्यंत चालते. जेल, कलरिंग, डॅक्स, हेअर स्प्रे याचा वापर करण्याची यासाठी कोणतीच आवश्यकता नाही.
 
हटके व्यक्तिमत्त्वासाठी
सध्या सुरु असलेल्या हेल्मेट सक्तीमुळे अनेकांना आपली हेअर स्टाईल मेटेंन ठेवता येत नाही. परंतु, आपण हेल्मेट जरी वापरात असला तरीही  अंडर टू स्पाईकमध्ये  केस छोटे असल्याने आपल्याला ती मेटेंन ठेवता येते.  यामुळे इतरांपेक्षा आपले व्यक्तीमत्त्च हे हटके वाटते.
पार्टी, स्पोर्ट व आॅफिस अशा कुठल्याही ठिकाणी ही हेअर स्टाईल कुठल्याही ड्रेसवर सूट होते . या फॅडमुळे तरुणाईची केस वाढविण्याची स्टाईलच जवळपास नाहीशी झाली आहे. सलूनमध्ये जाणारे जास्तीत जास्त तरुण या स्टाईलच पसंती देत आहेत.


घरच्या घरी करु शकता
अंडर टू स्पाईक ही हेअर स्टाईल्स करण्यासाठी तुम्हाला सलूनमध्येच जाण्याची आवश्यकता नाही. तर घरच्या घरीही स्वत : च्या हाताने तुम्ही ही स्टाईल करु शकता. अशी ही सर्वसामान्यांना परवडेल अशी स्टाईल आहे.

पावसाळ्यात उपयुक्त
पावसाळ्यात केस ही छोटी असणे आवश्यक आहेत. के स मोठे असल्यावर पावसात भिजल्यानंतर आजारी पडण्याचे लक्षणे अधिक असतात. छोटे केस हे लवकर कोरडे करता येत असल्याने आजारी पडण्याची भिती फार कमी असते. त्यामुळे पावसाळ्यात अंडर टू स्पाईक हेअर स्टाईल ही खूपच उपयुक्त आहे. यामुळे डोक्यात पिंपल्स, कोंडा होत नाही. उलट मोठ्या केसांमुळे स्कॅल्प लूज होऊन, मेटेंनसचाही प्रॉब्लेम उद्भवतो. तसेच  डोळ्यावरही त्याचा परिणाम  होतो. या फॅशनमुळे शाळांमध्येही अलीकडे शिक्षकांना केस कमी करावे हे मुलांना सांगण्याची गरज नाही.

बॉलीवूड स्टारही अंडर टू स्पाईक मध्ये
हल्लीला अंडर टू स्पाईक हेअर स्टाईल ही केवळ तरुणाईमध्येच नाही. तर बॉलीवूड स्टार मध्येही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित सुल्तान या चित्रपटात पहिलवानाच्या भूमिकेत असणारा  सलमान खान सुद्धा याच हेअर स्टाईलमध्ये आहे. तसेच गतवर्षी रिलीज झालेल्या ए.आर. रहमान यांचे संगीत असलेल्या तमाशा या चित्रपटाही रणबीर कपूर याच हेअर स्टाईलमध्ये होता. तमाशापासून तरुणाईत या स्टाईलचे फॅड आले आहे. यासह बॉलीवूडचे अन्य कलाकारही याच हेअर स्टाईलमध्ये दिसून येतात.

Web Title: Under the age of Spike hairstyles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.