वापरलेल्या ‘टी-बॅग’चा असाही उपयोग !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 08:05 AM2017-05-18T08:05:11+5:302017-05-18T13:35:11+5:30
बरेचजण हे टी-बॅग्स् वापर झाल्यानंतर फेकून देतात. काहीजणांनी यावर अभ्यास करून या वापरलेल्या टी-बॅग्स्चा पुनर्वापर कसा करता येईल यावर संशोधन केले आहे.
Next
स ्या प्रत्येक घरात टी-बॅग्स् सहज उपलब्ध आहेत. मात्र बरेचजण हे टी-बॅग्स् वापर झाल्यानंतर फेकून देतात. काहीजणांनी यावर अभ्यास करून या वापरलेल्या टी-बॅग्स्चा पुनर्वापर कसा करता येईल यावर संशोधन केले आहे. जाणून घेऊया की, अजून कोणत्या दुसऱ्या कामासाठी वापरता येतील हे टी-बॅग्स्.
* टी-बॅगचा वापर नॅचुरल माउथवॉशसाठीही केला जाऊ शकतो. यासाठी टी-बॅगला कोमट पाण्यात काही वेळासाठी ठेवा, त्यानंतर त्याला थंड होऊ द्या. हे माउथवॉश आपण कधीही तयार करु शकता आणि हे केमिकल फ्री आणि सुरक्षितदेखील आहे.
* जर आपल्या फ्रिज मध्ये दुर्गंधी येत असेल तर या टी-बॅगचा वापर केल्यास फायदेशीर ठरेल. यासाठी वापरलेले टी-बॅग्स् फ्रिजमध्ये ठेवावे. आपण या टी-बॅगला शूज मध्येही ठेऊ शकता. याने शूज मधून येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.
* लाकडाचे फर्निचर आणि फरशीची सफाईदेखील टी-बॅग्सने करु शकता. यासाठी कोमट पाण्यात टी-बॅग्स् टाक ा. त्यानंतर त्यात एक कपडादेखील टाकावा. या कपड्याने घरातील फरशी आणि फर्निचरची सफाई करावी. आपणास काही दिवसांनतर फरक जाणवेल.
* जर आपल्या घरात काचेच्या खिडक्या असतील तर त्यांना टी-बॅग्स्ने साफ करु शकता. शिवाय काचेच्या जेवढ्याही वस्तू असतील त्यांना आपण वापरलेल्या टी-बॅग्सने साफ करु शकता. याने आपल्या घराच्या खिडक्या आणि काचेच्या वस्तू नव्या दिसू लागतील.