व्हॉटस्अ‍ॅपचे आगामी उपयुक्त फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2016 05:45 PM2016-07-22T17:45:30+5:302016-07-22T23:15:30+5:30

येत्या काही काळात असेच अनेक एक्सायटिंग आणि उपयुक्त फीचर्स व्हॉटस्अ‍ॅपमध्ये दिसणार आहेत.

The upcoming useful features of Whatsapp | व्हॉटस्अ‍ॅपचे आगामी उपयुक्त फीचर्स

व्हॉटस्अ‍ॅपचे आगामी उपयुक्त फीचर्स

Next
हॉटस्अ‍ॅप म्हणजे स्मार्टफोन यूजर्सचा जीव की प्राण. जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी संपर्काचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे व्हॉटस्अ‍ॅप. युजर्सच्या सुविधेसाठी कंपनी नेहमीच नवनवीन अपडेट्सच्या माध्यमातून नवे फीचर्स आणत असते. येत्या काही काळात असेच अनेक एक्सायटिंग आणि उपयुक्त फीचर्स व्हॉटस्अ‍ॅपमध्ये दिसणार आहेत. कोणते असणार ते फीचर्स? 

१. कॉल बॅक

व्हॉटस्अ‍ॅप कॉलिंगची सुविधा उपलब्ध झाल्यापासून ‘कॉल बॅक’ची मागणी केली जात असे. अखेर नव्या 2.16.189 व्हर्जनमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे. जेव्हा कॉल रिजेक्ट केला जाईल तेव्हा अ‍ॅप स्क्रीनवर ‘कॉल बॅक’चे आॅप्शन दिसेल. अद्याप हे फीचर केवळ अँड्राईडसाठी असून ते फक्त व्हॉटस्अ‍ॅपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

२. नवीन फॉण्ट

व्हॉटस्अ‍ॅपवर चॅट करताना तोच तोच फॉण्ट पाहून बोर झालात? तर मग तुमच्यासाठी नवी अपडेट फार सुखवणारी गोष्ट आहे. अँड्राईड यूसर्जसाठी कंपनीने दुसºया फॉण्टमध्ये लिहिण्याची सुविधा दिली आहे. हा नवीन फॉण्ट विंडोजच्या ‘फिक्सड्सिस’ सारखाच दिसतो. नवीन फॉण्ट वापरण्यासाठी टेक्स्टच्या आधी व नंतर तीनदा (`) हे चिन्ह वापरावे लागेल.
 
३. म्युझिक शेअरिंग

व्हॉटस्अ‍ॅप लवकरच म्युझिक शेअरिंग फीचर देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याची सुरुवात अ‍ॅपल युजर्सपासून करण्यात येण्याची शक्यता आहे. या फीचरद्वारे आपल्या स्मार्टफोनमध्ये असणारे गाणे व अ‍ॅपल म्युझिक सर्व्हिसवरील गाणे यूजर्स एकमेकांशी शेअर करू शकतील.

४. ‘मेन्शन’ आणि ग्रुप इन्व्हाइट

फेसबुकप्रमाणेच आता व्हॉटस्अ‍ॅपवरही गु्रपमध्ये चॅट करत असताना ‘मेन्शन’ ही सुविधा देण्यात येणार आहे. गु्रपमध्ये एका विशिष्ट सदस्याला उद्देशून मेसेज पाठवताना त्याचे नाव ‘मेन्शन’ केले असता ते वेगळ्या रंगात दिसेल. ग्रुप इन्व्हाइट फीचरद्वारे तुम्ही इतर लोकांना ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी लिंक पाठवू शकता. लिंकवर क्लिक केले असता ते ग्रुपमध्ये अ‍ॅड होतील.

५. जीआयएफ

आयओएस प्लॅटफॉर्मवर व्हॉटस्अ‍ॅपमध्ये लवकरच ‘जीआयएफ’ इमेजेस अपलोड केल्या जाऊ शकणार आहेत. आयओएस बीटा व्हर्जन 2.16.7.1 मध्ये हे फीचर सर्वप्रथम सामील करण्यात आले होते. स्पर्धक इस्टंट मेसेंजर वुईचॅट आणि लाईन या अ‍ॅप्समध्ये आगोदरच ही सुविधा आहे.

६. मोठ्या आकाराच्या इमोजी

पुढील अपडेटमध्ये मोठ्या आकाराच्या इमोजी देण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अ‍ॅपलनेदेखील अशाच प्रकारची घोषणा आगामी आयओएस १० साठी केली आहे.

Web Title: The upcoming useful features of Whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.