तरुण दिसण्यासाठी वापरा या फॅशन ट्रीक्स !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 04:26 PM2017-01-06T16:26:25+5:302017-01-06T16:26:25+5:30
आपले जसे वय वाढत जाते तसे आपले राहणीमानही बदलत जाते. मात्र अनेकांना वय वाढलेले अजिबात आवडत नाही. आपण नेहमी तरुण दिसावे असेच वाटते. मात्र, वेळ कधी कुणासाठी थांबत नाही. तरीही आपण खाली दिलेल्या ट्रीक्स फॉलो केल्यास आपण अधिक तरुण दिसण्यास मदत होईल.
Next
* टी-शर्ट - तुमच्याजवळ व्यर्थ घालवायला वेळ नसेल तर टी-शर्ट तुमच्यासाठी बेस्ट आहे. जीन्सवर किंवा पेन्सिल स्कर्टवर कॉटन टी-शर्ट चांगले दिसेल.
* ओव्हरसाईझ स्वेटर - ओव्हरसाईझ कपड्यांमध्ये उपजतच तारूण्याचा उत्साह असतो. परंतु काळ्या रंगाने त्यात अधिक भर पडते. काही प्रिंटेड लेगिंग्स, स्कीनी जीन्स किंवा शायनी लेदर पँटसोबत घातलेले हे स्वेटर सिंपल असूनही मस्त दिसेल.
* अँकल लेंथ बूट - तुमचे वय कितीही असो, अँकल लेंथ बूट तुम्हला नक्कीच तरूण बनवतील. अँकलपासून काही इंच वर असलेले उत्कृष्ट कलाकारी केलेले, बकल्स असलेले हे बूट सुंदर दिसतात. ब्लॅक जरी युनिव्हर्सल रंग असला तरी यात रेड हील्स अधिक उत्साही दिसेल.
* स्ट्रेची पँट्स - पँटकडे जरी हिट आॅर मिस म्हणून पाहिले जात असले तरी नवीन फॅब्रिकच्या स्ट्रेची पँट तुम्हाला वेगळा लूक देतील. स्ट्रेट किंवा नॅरो लेग व बॅक पॉकेट असलेली फ्लॅट-फ्रंट पँट एक आयडियल पर्याय आहे. लक्षात ठेवा की पँट तुमच्या पावलांपर्यंत किंवा सँडलपर्यंत लांब हवी.