VALENTINE DAY SPECIAL : गिफ्ट आइडियाज !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2017 11:45 AM2017-02-12T11:45:59+5:302017-02-12T17:15:59+5:30
मुलांकडे आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध असतात. मात्र मुली अशावेळी मागे पडतात. खूप विचार करुनही ते आपल्या बॉयफ्रेंडला योग्य गिफ्ट देऊन आनंदी करु शकत नाही.
Next
फेब्रुवारी महिना म्हटले म्हणजे आठवण येते ती ‘व्हॅलेंटाइन डे’ ची. या दिवशी प्रत्येकजण काहीना काही गिफ्ट देऊन आपले प्रेम व्यक्त करीत असतात. तसे मुलांकडे आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध असतात. मात्र मुली अशावेळी मागे पडतात. खूप विचार करुनही ते आपल्या बॉयफ्रेंडला योग्य गिफ्ट देऊन आनंदी करु शकत नाही. जर आपणही अशा गोंधळात असाल तर खालील टिप्स आपणास मदत करतील.
* ब्लूटुथ स्पीकर
सध्या ब्लूटुथ स्पीकरांची खूपच क्रेज दिसत आहे. शिवाय ते आपल्या बजेटमध्येही उपलब्ध आहेत. जर आपल्या बॉयफे्रंडला संगीतात आवड असेल तर तुम्ही दिलेले हे गिफ्ट त्याला नक्कीच आवडेल.
* कांदबरी
जर आपल्या बॉयफे्रंडला पुस्तक वाचनाची आवड असेल तर त्याला आपण एक चांगली कादंबरी देऊ शकता. शिवाय ती महागही नसते. मात्र पायरेटेड कादंबरी देऊ नका. यामुळे आपली छाप त्याच्यावर चांगली नाही पडणार.
* पाकिट
गिफ्ट देण्यासाठी पाकिट हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी आपल्या पार्टनरला महागडेच पाकिट द्यावे असे काही नसते. बाजार कित्येक प्रकारचे पाकिट उपलब्ध आहेत. आपण आपल्या बजेटमध्ये खरेदी करु शकता. शिवाय बाजारात पाकिट, कंबरपट्या आणि घड्याळ यांचा कॉम्बो पॅकही मिळतो. आपण हा पॅकही त्याला देऊ शकता.
* जॅकेट किंवा ब्लेजर
आपला पार्टनर स्टायलिश दिसण्यासाठी त्याला आपण जॅकेट देखील देऊ शकता. या दिवसात बहुतेक ठिकाणी याचा सेलही लागलेला असतो. तेथून आपण जॅकेट किंवा ब्लेजर खरेदी करुन देऊ शकता.
* घड्याळ
घड्याळ थोडी महाग असते. मात्र याने आपला बॉयफें ड नक्कीच आनंदी होईल. मुलांना घड्याळ जास्त पसंत असते. घड्याळ देताना थोड्या चांगल्या दर्जाचीच द्या. जेणेकरुन ती लवकर खराब होणार नाही.