VALENTINE SPECIAL : वयाने लहान व्यक्तीवर प्रेम करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2017 01:07 PM2017-02-07T13:07:06+5:302017-02-07T18:37:06+5:30
आपणही जर आपणाहून लहान वयाच्या व्यक्तीवर प्रेम करीत असाल आणि आपणास जर हे नाते अधिक मजबूत असेल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
Next
हे खरे आहे की प्रेमात वयाचे काही बंधन नसते. आपणास एखादा व्यक्ती आवडतो आणि त्यावर प्रेम करायला लागतो. यावेळी तो किती लहान आहे किंवा किती मोठा याचा साधा विचारही मनात येत नाही. आपणही जर आपणाहून लहान वयाच्या व्यक्तीवर प्रेम करीत असाल आणि आपणास जर हे नाते अधिक मजबूत असेल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
* कमी वयाचे व्यक्ती नात्यात कमिटमेंट करण्यासाठी घाबरतात. कारण ते कमी वयात जबाबदारी नाही पेलू शकत असे त्यांना वाटते. अशा परिस्थितीत त्यांच्यावर दबाव टाकण्याऐवजी त्यांच्याशी प्रेमाने व्यवहार करा. नात्यात पूर्णत: गुंतल्याने आपले स्वातंत्र्य नष्ट होईल असे त्यांना वाटते.
* कमी वयाच्या व्यक्तींना लूक, देखावा जास्त महत्त्वाचा असतो, मग तो स्वत:चा असो की पार्टनरचा. अशावेळी अगोदर स्वत:ला आरशासमोर ठेवा, आपण कसे दिसतो ते पाहा आणि मग भेटायला जा.
* कमी वयाची व्यक्ती भविष्याची जास्त चिंता करीत नाही. फक्त ते वर्तमानकाळात जगतात म्हणून जास्त खर्चही करतात. अशावेळी आपण आपल्या पाकिटाचाही विचार करावा. सोबतच त्यांना समजावा की नाहक केलेला खर्च फायदेशीर नसतो.
* कमी वयाची व्यक्ती आपल्या पार्टनरमध्ये आपले पालक शोधत असतो. जर आपण एखाद्या कमी वयाच्या व्यक्तीसोबत डेटिंगसाठी जात असाल त्याचे लहान मुलासारखे वागणे सहन करण्यासाठी तयार राहावे. आपला अनुभव आणि वय दोन्हीही जास्त असल्याने ती व्यक्ती आपला आदरही करते. त्यामुळे त्यांची काळजी घ्या.
Also Read : PROPOSE DAY SPECIAL : मुलीला प्रपोज करायचंय? वापरा या १० क्रिएटिव्ह टिप्स !
PROPOSE DAY SPECIAL : गर्लफ्रेंडला ‘प्रपोज’ करताना !