VALENTINE WEEK LIST: किस डे, प्रोपोज डे, चॉकलेट डे - ’व्हॅलेंटाईन्स डे’पर्यंतच्या संपूर्ण दिवसांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2017 11:02 AM2017-02-06T11:02:41+5:302017-02-06T16:39:49+5:30

व्हॅलेंटाईन्स वीक’ची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून होत असते. या दिवशी ‘रोझ डे’ असतो. त्यानंतर प्रोपोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि सर्वात शेवटी व्हॅलेंटाईन्स डे असतो.

VALENTINE WEEK LIST: Kiss day, Propose Day, Chocolate Day - Whole day's list of 'valentines day' | VALENTINE WEEK LIST: किस डे, प्रोपोज डे, चॉकलेट डे - ’व्हॅलेंटाईन्स डे’पर्यंतच्या संपूर्ण दिवसांची यादी

VALENTINE WEEK LIST: किस डे, प्रोपोज डे, चॉकलेट डे - ’व्हॅलेंटाईन्स डे’पर्यंतच्या संपूर्ण दिवसांची यादी

googlenewsNext
हॅलेंटाईन डे आता अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. आजपासून ते १४ फेब्रुवारीपर्यंत ‘व्हॅलेंटाईन वीक’ असतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे काही ना काही वैशिष्ट्ये असते. म्हणजे किस डे, प्रोपोज डे, चॉकलेट डे वगैरे वगैरे. फेब्रुवारी महिना सुरू होताच प्रेमवीरांचे मन जोरजोरात धडधडायला लागते.

१४ फे्रबुवारीची सर्व जण मनोमन वाट पाहतात. आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की, व्हॅलेंटाईन्स डे का साजरा केला जातो? संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमीयुगुल एक मेकांना गिफ्ट देऊन प्रेमाची कबुली देतात.

हा दिवस साजरा करण्याची सुरूवात तशी एकोणिसाव्यास शतकाच्या सुरूवातीला अमेरिकेत झाली. हळूहळू मग युरोप आणि इतर देशांतही तो मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला. आजकाल तर ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशी मोठी व्यवसायिक उलाढाल होते. चॉकलेट आणि गुलाबाच्या फुलांची विक्री तर सगळे विक्रम काढत असते.

‘व्हॅलेंटाईन्स वीक’ची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून होत असते. या दिवशी ‘रोझ डे’ असतो. त्यानंतर प्रोपोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि सगळ्यात शेवटी व्हॅलेंटाईन्स डे असतो. म्हणजे,

७ फेब्रुवारी - रोझ डे
८ फेब्रुवारी - प्रोपोझ डे
९ फेब्रुवारी - चॉकलेट डे
१० फेब्रुवारी - टेडी डे
११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे
१२ फेब्रुवारी - हग डे
१३ फेब्रुवारी - किस डे
१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन्स डे

आता या प्रत्येक दिवशी काय करत असतात ते पाहू...

* रोझ डे - ७ फेब्रुवारी

Rose day

आपल्या आवडत्या व्यक्तीला या दिवशी गुलाबाचे फुल देत असतात. प्रेमाची सुरूवात म्हणून हा दिवस साजरा केला जातो. बरं गुलाब तुम्ही आई-वडिल, भाऊ-बहीण, आजी-आजोब यांनासुद्धा देऊ शकता.
* प्रोपोज डे - ८ फेब्रुवारी

Propose Day

‘व्हॅलेंटाईन्स वीक’च्या या दुसऱ्या दिवशी तुम्ही आवडत्या व्यक्तीला तुमच्या मनातील भावना सांगायच्या असतात. त्यांना गिफ्ट आणि फुले देऊन प्रेमाची अधिकृ त कबुली किंवा कल्पना द्यायची असते.
* चॉकलेट डे - ९ फेब्रुवारी

chocolate

जसे की नावाप्रमाणे हा संपूर्ण दिवस चॉकलेच्या नावे असतो. या दिवशी केवळ चॉकलेट असणाऱ्याच भेटवस्तू द्यायच्या असतात. चॉकलेट तर सगळ्यांनाच आवडते. तुमच्या प्रेमाचा गोडवा अधिक वाढण्यासाठी हा दिवस असतो.

* टेडी डे - १० फेब्रुवारी
teddy

‘टेडी बेअर’ नेहमीच प्रेमाचे निरागस प्रतीक राहिलेले आहेत. मुलींना तर मऊमऊ मखमली टेडी बेअर्स खुप आवडतात. दरवर्षी १० फेब्रुवारीला साजरा केल्या जाणाऱ्या ‘टेडी डे’च्या दिवशी एक छानसा टेडी गिफ्ट करायचा असतो. अशा खेळणीमुळे बालपणातील आठवणींनाही उजाळा मिळतो.
* प्रॉमिस डे - ११ फेब्रुवारी

Promise

कोणत्याही नात्यामध्ये ‘वचना’ला खूप महत्त्व असते. नाते टिकून राहण्यासाठी दिलेली सर्व वचने पाळावीच लागतात. या दिवशी आपल्या प्रियकरा/प्रेयसीला काही वचन द्यायचे असते. प्रेमासोबत काही जबाबदाऱ्याही येत असतात. त्या निभावण्याचे वजन देणे अपेक्षित असते. तुमचे प्रेम किती खरे आहे हे दाखवण्याचा हा दिवस असतो.
* हग डे - १२ फेब्रुवारी

Hug day

‘व्हॅलेंटाईन्स डे’साजरा करण्यापूर्वी दोन दिवस अगोदर ‘हग डे’ सेलिब्रेट केला जातो. आदल्या दिवशी केलेल्या प्रॉमिसनंतर एकमेकांना मिठी मारून नात्याला घट्ट करण्यासाठी हा दिवस असतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाने आलिंगन देऊन तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता हे सांगू शकता. त्यातुन तुमची काळजी, स्नेहभाव दिसतो.
* किस डे - १३ फेब्रुवारी

kiss day

‘व्हॅलेंटाईन वीक’चा सहावा दिवस म्हणजे किस डे. या आठवड्यातील सर्वात लोकप्रिय दिवसही म्हटले जाऊ शकते. प्रेम व्यक्त करण्यासाठी चुंबन घेण्याची प्रथा या दिवशी असते. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या प्रेमाची कबुली अत्यंत प्रेमळपणे देण्याचा हा दिवस. नात्याला ‘सिरीयस’ मोड देण्याचा हा टप्पा असतो.
* व्हॅलेंटाईन्स डे - १४ फ्रेबुवारी

couple

आता या दिवसावर आतापर्यंत एवढे काही लिहून झालेले आणि तुम्हीदेखील खूप काही वाचलेले असेल. असे म्हणतात की, कोणाविषयी खरे प्रेम असेल तर सांगायला उशिर करू नका. मनातले सगळे सांगून टाका. ‘व्हॅलेंटाईन्स डे’ हा त्यासाठीच असतो. तुमचे खरे प्रेम समोरच्या व्यक्तीला सांगण्याचा हा दिवस. इतके दिवस मनात ठेवलेल्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

तर मग उद्यापासून व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यास सुरूवात करा आणि जीवनात प्रेमाचा अनुभव घ्या. या वर्षी तुमचा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ प्लॅन काय आहे हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा...

ALSO READ: ​​आज साजरा करा हेल्दी व्हॅलेंटाईन डे

Web Title: VALENTINE WEEK LIST: Kiss day, Propose Day, Chocolate Day - Whole day's list of 'valentines day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.