तणावमुक्तीसाठी तरुणांमध्ये व्हिडिओ गेमचे व्यसन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2016 02:30 PM2016-04-27T14:30:32+5:302016-04-27T20:00:32+5:30

तणावापासून मुक्ती मिळावी म्हणून तरुण व्हिडिओ गेम्सचा आसरा घेतान दिसत आहेत.

Video game addiction among youth for stress relief | तणावमुक्तीसाठी तरुणांमध्ये व्हिडिओ गेमचे व्यसन

तणावमुक्तीसाठी तरुणांमध्ये व्हिडिओ गेमचे व्यसन

Next
च्या स्पर्धेच्या युगात तरुणांवर सर्वाधिक प्रेशर आहे. स्वत:ला सिद्ध करणे, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे, चांगली नोकरी मिळवण्याचा दबाव त्यांच्यावर असतो. या दबावामुळे त्यांच्यावरचा तणाव वाढत आहे. या तणावापासून मुक्ती मिळावी म्हणून तरुण व्हिडिओ गेम्सचा आसरा घेतान दिसत आहेत.

नवीन रिसर्चमधून असे आढळून आले की, अटेंशन डिफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसआॅर्डर (एडीएचडी), आॅब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसआॅर्डर (ओएसडी), नैराश्य यांसारख्या मानसिक स्थितीमध्ये विसावा मिळावा म्हणून तरुण व्हिडिओ गेम्स खेळतात.

बर्गेन विद्यापीठातील वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ सेसिल शोऊ अँड्रेसन यांनी सांगितले की, व्हिडिओ गेम्सचे व्यसन तरुणांमध्ये अधिक असते. अँड्रेसन यांनी सुमारे 20 हजार तरुणांना व्हिडिओ गेम व्यसनासंबंधी प्रश्न विचारले. त्यातून व्हिडिओ गेम आणि एडीएचडी व नैराश्य यांचा संबंध समोर आला.

Web Title: Video game addiction among youth for stress relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.