अंबानींच्या सुनेचे नववधू लूकमधील नवीन फोटो व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 01:31 PM2019-03-13T13:31:27+5:302019-03-13T13:31:58+5:30
श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचा शाही विविहसोहळा 9 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये या विविहसोहळ्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचा शाही विविहसोहळा 9 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये या विविहसोहळ्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच सर्वाचं लक्ष होतं ते म्हणजे, अंबानींच्या सूनेच्या नववधू लूकवर. अनेक व्हायरल होणाऱ्या फोटोंसोबतच श्लोका मेहताचे नववधू लूकमधील नवीन कॅन्डीड फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
ब्रायडल लूकमध्ये श्लोका मेहताचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. लग्नासाठी श्लोकाने प्रसिद्ध डिझायनर जोडी अबू जानी-संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला लेहेंगा परिधान केला होता. रेड कलरच्या या लेहेंग्यामध्ये श्लोका एखाद्या राजकन्येप्रमाणेच दिसत होती.
श्लोकाच्या या लेहेंग्यावर हॅन्ड एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. जडाऊ आणि जरदोजी कटवर्क करण्यात आलं होतं. दुपट्ट्याच्या बॉर्डरवर फ्लोरल मोटिफचा वापर करण्यात आला होता. ज्यामुळे दुपट्ट्याला क्लासी लूक मिळत होता.
श्लोका लग्नाच्या दिवशी अत्यंत सुंदर दिसत होती. तिने रेड कलरच्या लेहेंग्यासोबत हेव्ही कुंदन आणि ग्रीन एमराल्ड ज्वेलरी परिधान केली होती. गळ्यामध्ये चोकर नेकपीससोबत राणी हार परिधान केला होता.
अंबानींच्या शाही विविहसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. परंतु, श्लोकाच्या ब्राइडल लूकमधील एकही फोटो समोर आला नव्हता.
डिझायनर जोडी अबू जानी-संदीप खोसला यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून श्लोकाच्या ब्राइडल लूकचे काही कॅन्डीड फोटो पोस्ट केले आहेत.
दरम्यान, श्लोका आणि आकाश अंबानीच्या या शाही विवाहसोहळ्यासाठी देश-विदेशातील मोठे उद्योगपती आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. एवढचं नाही तर बॉलिवूड, पॉलिटिक्स, क्रिडा क्षेत्रातील अनेक दिग्गज या नवविवाहीत जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
9 मार्चला मुंबईमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेल्या लग्नानंतर 10 मार्च रोजी पोस्ट वेडिंग पार्टी ठेवण्यात आली होती. त्यानंतर 11 मार्च रोजी ग्रॅड रिसेप्शनचंही आयोजन करण्यात आलं होतं. तीन दिवस चाललेल्या या शाही विवाहसोहळ्याच्या चर्चा संपूर्ण देशासह जगभरामध्ये सुरू होत्या.