भारतातल्या योगशिक्षणासाठी प्रसिध्द असलेल्या या 6 ठिकाणांना भेट द्या. पर्यटनासोबतच फिटनेस जपण्याचाही आनंद घ्या.
By Admin | Published: July 14, 2017 04:38 PM2017-07-14T16:38:13+5:302017-07-14T16:38:13+5:30
तुमच्या पर्यटनाच्या उद्देशामध्ये मौजमजेसोबतच फिटनेसचाही समावेश असेल तर भारतातल्या योगशिक्षणासाठी सर्वोत्तम अशा ठिकाणांना भेट द्या.
- अमृता कदम
फिरायला जायचं, म्हणजे मौजमजा आणि निवांतपणासाठी. पण पर्यटनाकडे एवढ्याच मर्यादित दृष्टिकोनातून आता बघितलं जात नाही. त्यामुळेच हेल्थ टूरिझम, मेडिकल टूरिझम, आर्ट टूरिझम असे फिरण्याच्या उद्देशानुसार पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार विकसित होत आहेत. तुम्हीही जर पर्यटनाचा असा वेगळ्या अँगलनं विचार करत असाल आणि तुमच्या पर्यटनाच्या उद्देशामध्ये मौजमजेसोबतच फिटनेसचाही समावेश असेल तर सामान पॅक करा, मॅट गुंडाळा आणि भारतातल्या योगशिक्षणासाठी सर्वोत्तम अशा ठिकाणांना भेट द्या. ग्लॉसी एअर-कंडिशन्ड स्टुडिओमध्ये योगा करण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात योगशिक्षणाचा अनुभव तुमच्या आरोग्य आणि मन:शांतीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
ओशो मेडिटेशन रिसॉर्ट, पुणे
तुमच्या धकाधकीतून शांततेचा अनुभव आणि योगाचा सर्वांगिण अभ्यास करायचा असेल तर पुण्यातल्या ओशो मेडिटेशन रिसॉर्टला नक्की भेट द्या. कोरेगाव पार्क भागात 28 एकरांच्या परिसरात वसलेल्या या ठिकाणी तुम्हाला प्राचीन आश्रमपद्धती आणि आधुनिक रिसॉर्टमधल्या सोयीसुविधांचा मेळ पाहायला मिळेल. मेडिटेशम सेंटर्स, योगा आणि ध्यानधारणेसाठी हिरव्यागार बागा, स्वीमिंग पूल, स्पा आणि बरंच काही तुम्हाला या रिसॉर्टमध्ये पाहायला मिळेल. तुमच्या सवडीनुसार इथे तुम्ही योगाभ्यासाचे कोर्सेस निवडू शकता.