विवेकानंद रॉक मेमोरियलला एकदा अवश्य भेट द्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 05:16 PM2016-12-28T17:16:07+5:302016-12-28T17:16:07+5:30

महान ज्ञानीपुरुष स्वामी विवेकानंदांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा म्हणजे कन्याकुमारी. हे दक्षिणेतील मुख्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असून, याठिकाणी विवेकानंद रॉक मेमोरियलची स्थापना झालेली आहे.

Visit Vivekananda Rock Memorial Once! | विवेकानंद रॉक मेमोरियलला एकदा अवश्य भेट द्या !

विवेकानंद रॉक मेमोरियलला एकदा अवश्य भेट द्या !

Next
ान ज्ञानीपुरुष स्वामी विवेकानंदांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा म्हणजे कन्याकुमारी. हे दक्षिणेतील मुख्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असून, याठिकाणी विवेकानंद रॉक मेमोरियलची स्थापना झालेली आहे. विशेष म्हणजे याठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत असते. कन्याकुमारीला भेट देण्याऱ्यामध्ये हे मेमोरियल खूपच लोकप्रिय आहे. 

ज्याठिकाणी स्वामी विवेकानंदांनी आत्मज्ञान प्राप्त केले त्या वनथिराई समुद्रकिनाऱ्यापासून ५०० मीटर लांब अंतरावरील भव्य खडकावर हे स्मारक बांधले आहे. विशेष म्हणजे या खडकावरून अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर, या भारतीय उपखंडातील तीन समुद्राचे विलीन बिंदू पाहू शकतो. स्मारकाच्या आत, चिंतन सभागृह किंवा ध्यानचंद मंडपम आहे, जिथे अभ्यागत एकत्र ध्यान लावू शकतात. या स्थानात शांततेची भिन्न आभा पसरलेली आहे आणि येथे एक वेगळीच मनाची स्थिरता अनुभवायला मिळते असा दावा येथे जाणारे पर्यटक करतात. ध्यानचंद मंडपममध्ये तास दोन तास ध्यान लावल्याने एकांतवासची अनुभुती प्राप्त होते. संरचनात्मकदृष्ट्या, विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये देशभरातील मंदिरांच्या स्थापत्यकलेच्या विविध शैली बघायला मिळतात. तथापि, येथील लक्षवेधक स्वागतकक्ष बेलूरच्या श्री रामकृष्ण आश्रमाची आठवण करून देतो. शिवाय, प्रवेशद्वार महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ लेणी समान आहे. मुख्य सभागृहात, विवेकानंदांचा ब्रांझचा पुतळा आहे जो त्यांच्या लोकप्रिय परिव्राजक पवित्रामध्ये बघायला मिळतो.

 

Web Title: Visit Vivekananda Rock Memorial Once!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.